Author Archives: Anmol

डिजीटल पिंपरी-चिंचवड काळाची गरज

डिजीटल इंडियाच्या धर्तीवर राज्य सरकारने डिजिटल महाराष्ट्राचा संकल्प मांडला आणि त्यादिशेने विविध कामांची सुरवात केली. केंद्र, राज्यसरकारच्या धोरणाला समांतर असे शहराचे धोरण महापालिकेने बनवले पाहिजे त्यामुळे केंद्र-राज्य-शहर तिन्ही पातळीवर सुसूत्रता येउन त्याचा थेट परिणाम सामान्य नागरिकांचे जीवन उंचावण्यात होईल अशी मला खात्री वाटते. ‘डिजिटल पिंपरी-चिंचवड’ असे संबोधून आपण हा विषय का व कसा महत्वाचा आहे यावर माहिती घेऊयात. केवळ महानगरपालिका गृहीत न धरता डिजिटल पिंपरी-चिंचवड उपक्रमात शहरातील सर्व शासकीय, निम-शासकीय सरकारी यंत्रणांचा सहभाग अपेक्षित आहे. जरी केंद्र/राज्य/शहर या वेगवेगळ्या पातळ्या असल्या, त्यांमध्ये विविध खाती असली तरी सामान्य नागरिकासाठी सरकार हे एकच असते. या नात्याने ‘डिजिटल पिंपरी-चिंचवड’ उपक्रमाची जबाबदारी पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे सोपवणे व्यवहार्य व सोयीचे ठरेल. Continue reading

Advertisements
Posted in प्रेरणा, माहिती, Uncategorized | Tagged , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , | यावर आपले मत नोंदवा

दाटली नीज या दिशातूनी, पाडसा निजतोस ना रे…

गाणे गायला आवडत जरी असले तरी त्यातले संपूर्ण ज्ञान नसले कि होते फजिती! मागे बायकोच्या डोहाळ जेवणाच्या कार्यक्रमात खास अंगाई गीत गाण्यासाठी आईने तिच्या मैत्रिणीला बोलावले होते. उत्साही मला सुद्धा ‘नीज माझ्या नंदलाला’ गायचा मोह आवरता आला नाही… त्याच उत्साहात … Continue reading

Posted in Uncategorized | Tagged , , , , | यावर आपले मत नोंदवा

‘सारथी’चे दिवस …माझ्या नजरेतून

माझा फोन खणाणला. पलीकडून मित्र फोनवर उत्साहाच्या भरात “अरे अमोल झकास! मी माझ्या घरासमोरील रोडची तक्रार ‘सारथी’वर दिली आणि केवळ ३ दिवसात पिंपरी-चिंचवड पालिकेने तक्रारीवर समाधानकारक कारवाई केली!”. अनेकांना परिचित असलेले ‘सारथी’ नाव लवकरच पिंपरी चिंचवडच्या घराघरात पोहोचणार आहे. काय … Continue reading

Posted in अनुभव, प्रेरणा, माहिती, Uncategorized | Tagged , , , , , , , , | यावर आपले मत नोंदवा

महिला दिन विशेष – सुनिता देशपांडे

आठवत नाही नक्की कधी आईने (सुनिता देशपांडे) समाजकार्यात स्वतःला वाहून घेतले, मी नववीत होतो 1999 साली तेव्हाचे आठवते कामशेतला जाऊन आई खेड्यातील परिस्थितीने गरीब मुलींसाठी फर टॉंईजचे क्लास घेत होती, माझ्या लहान भावाला जसे कळायला लागले तेव्हा चूल-मुल यातून बाहेर पडत आईने … Continue reading

Posted in अनुभव, प्रेरणा, माहिती | Tagged , , , , , , | 3 प्रतिक्रिया

2012 in review

The WordPress.com stats helper monkeys prepared a 2012 annual report for this blog. Here’s an excerpt: 600 people reached the top of Mt. Everest in 2012. This blog got about 5,700 views in 2012. If every person who reached the … Continue reading

Posted in Uncategorized | Tagged , | यावर आपले मत नोंदवा

सहस्त्र चंद्र आहेत साक्षीला

आज्जीच्या सहस्त्रचंद्रदर्शन सोहळ्यासाठी रचलेल्या ओळी… आभाळाएवढी उत्तुंग तुझी माया परोपकाराचे दिलेस धडे आम्हाला तुझ्या अगाध महिमेला… सहस्त्र चंद्र आहेत साक्षीला अल्लड मुलगी होतीस कधी, झालीस संसारदक्ष पत्नी तू आईचे ममत्व अन् आज्जीचा बटवा लेवून शोभतेस बरी पणजी तू तुझ्या यशस्वी वाटचालीला… सहस्त्र चंद्र आहेत साक्षीला परस्थिती होती बिकट … Continue reading

Posted in कविता | Tagged , , , | यावर आपले मत नोंदवा

माझी छकुली

आई बाबाची सुंदर परी नाजूक हसरी गोड गोजिरी केसांची बट जेव्हा हळूच डोळ्यांसमोर येते टपोरे डोळ्यांची जोडी आतून छान लुकलुकते तिचे घरभर दुडू दुडू रांगणे, चुटू चुटू बोलणे हरखून टाकणारे खट्याळ वागणे आणि नटखट हसणे किती ग गोंडस तुझ्या गालावरची खळी दिसते रागावली कि मात्र चिमुकल्या ओठांचा चंबू करून बसते भरवताना मऊ-मऊ दुधभाताचा घास चिऊ काऊशी तिची जमली गट्टी खास दिवसामागून दिवस कसे भुर्रकन उडाले तिच्या भोवतालच्या जादुई … Continue reading

Posted in कविता | Tagged , , , , , , , | १ प्रतिक्रिया

मैं परेशान

नुकताच दहावीचा निकाला लागला, हुश्शsss सुटलो बुवा… काहिशी अशीच प्रतिक्रिया अनेकांची असणार (माहितेय, पुढच्या बेंच वरचे सो कॉल्ड टॉपर लोक वगैरे सोडून) …निकालानंतर सगळीकडे आनंदीआनंद असतो पण परीक्षेच्या आधी वर्षभर वातावरण वेगळेच दिसून येते. दहावीच्या परीक्षेला घरच्यांनी जणूकाही लढाईचे स्वरूप आणलेले असते, अश्या या लढाईत … Continue reading

Posted in कविता | Tagged , , , , , | १ प्रतिक्रिया

सुंदर आहे मी

जसे वर्तुळावर कोनाचे असणे असंभव जसे समांतर रेषांचा मिलाप अशक्य तसे माझ्यातील विरोधाभासाचे संपणे अशक्य रंग हिरवा नसेल तर झाडही नसावे झाड उन्हात पडणाऱ्या पावसाला म्हणेल का कोणी आल्हाद माझ्यात लपलेल्या मला घालेल का कोणी साद? दिसत नाही तरी देवाचे अस्तित्व आम्हास मान्य … Continue reading

Posted in कविता, कैफियत | Tagged , | १ प्रतिक्रिया

VOTE OUT CORRUPTION… in filmy style

“Let us Vote… to VOTE out Corruption” ह्या टीम अण्णांच्या घोषणेला जरा फिल्मी इस्टाईल  तडका मारून नुकत्याच झालेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत महाजालावर अनेकांना त्याची चव चाखायला दिली होती, रेसिपी जमली होती बरका ;)… का माहित नाही, मी ब्लॉग वर तेव्हाच का … Continue reading

Posted in Uncategorized | Tagged , , , , | यावर आपले मत नोंदवा