इंद्रायणीथडी जत्रा 2023 | देशातला सर्वात मोठा महोत्सव

हुश्श्श…

महोत्सवाचे पाच दिवस संपले! 24 लाखापेक्षा अधिक नागरिकांनी भेट देणारा हा इंद्रायणी थडी चा सोहळा अतिशय संस्मरणीय ठरला. उपमुख्यमंत्री देवेंद्रजी म्हणाले त्याप्रमाणे हा राज्यातला नव्हे तर देशातल्या सर्वात मोठ्या महोत्सवापैकी एक म्हणून इंद्रायणी थडी आता ओळखली जाईल. याचे सर्व श्रेय जाते पिंपरी चिंचवडचे कार्यकुशल आमदार महेशदादा लांडगे यांना.

◾कसा झाला 2023 चा हा भव्य सोहळा, संक्षिप्त आढावा

  • यंदा जत्रेचे मुख्य आकर्षण असलेल्या अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराच्या भव्य प्रतिकृतीने दर्शकांच्या मनाचा ठाव घेतला, • भक्तांसाठी राम मंदिरात अखंड भजन महोत्सव सुरू होते • प्रभू श्रीराम, छत्रपती संभाजी महाराज यांची मूर्ती आणि बैलगाडा शर्यतीची प्रतिकृती यांसमोर सेल्फी घेण्यासाठी झुंबड उडाली होती, • प्रवेश करताच ध्यान आकर्षित करणाऱ्या ग्रामसंस्कृती मध्ये संपूर्ण वसवलेले गाव, बारा बलुतेदार व्यवस्था पहाण्यासाठी लोकांची गर्दी झालेली दिसली, • तब्बल 17 एकर जागेवर भरलेल्या या महोत्सवामध्ये 1000 हून अधिक महिला बचत गटांना स्टॉल वाटप करण्यात आले या सर्व स्टॉलमधून सलग 5 दिवस नागरिकांनी खरेदीचा आनंद लुटला त्यामुळे सुमारे 20 हजार महिलांच्या हाताला रोजगार मिळाला. यातून खऱ्या अर्थाने महिला सबलीकरण व सक्षमीकरणाची प्रचिती मिळाली, • ऐतिहासिक शस्त्र व शूरवीर मराठे सरदारांचे शिल्प प्रदर्शन • उंदेरी खांदेरी जलदुर्गाची प्रतिकृती • पक्षनिष्ठा स्मारक जिथे महेश दादांनी स्वतःच्या आईचे व पक्षातील दिवंगत नेत्यांचे अर्धाकृती पुतळे उभारून आदरांजली वाहिली • भजन महोत्सव, • बाल गोपाळांसाठी 150 पेक्षा अधिक खेळणी असलेल्या मोफत बालजत्रेने बच्चेकंपनी खूष झाली, • युवावर्गासाठी नोकरी महोत्सव ज्यामध्ये 25 पेक्षा अधिक कंपन्यांनी भाग घेत ऑन द स्पॉट नोकऱ्या दिल्या, • महिला, जेष्ठांसाठी आरोग्य शिबीर ज्यामध्ये 12 हॉस्पिटलने सहभाग घेत 20 पेक्षा अधिक मोफत चाचण्या उपलब्ध केल्या. करमणुकीसोबत करीयर आणि आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक सेवा, मार्गदर्शन हे सर्वकाही एकाच ठिकाणी अनुभवयास मिळाले…

महोत्सवाचे फोटो, व्हिडियो महेश दादांच्या फेसबुक पेजवर पहाता येईल facebook.com/maheshklandge

◾ केवळ 3 आठवड्यातले नियोजन
जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात महोत्सव आयोजन करण्याविषयी साशंकता होती परंतु दादांनी ग्रीन सिग्नल दिल्यावर 7 जानेवारी रोजी सर्व कोअर टीमची मीटिंग कार्तिक आणि प्रसाद सरांच्या नेतृत्वात झाली आणि इथून पुढे सूरू झाला आमचा प्रवास. कमी वेळात महोत्सव कसा दिमाखदार करता येईल याबाबत सर्वांचे brainstorming झाले, अनेकविध कल्पना आणि त्याची व्यवहार्यता तपासून महोत्सवाची व्याप्ती अंतिम करण्यात आली. कोणाची काय क्षमता आहे हे अचूक हेरून प्रसाद सरांनी सर्वांना जबाबदारी वाटून दिली. कमी कालावधी, कारागिरांची उपलब्धता यांचा मेळ घालत आर्थिक नियोजन करणे खरेतर फारच आव्हानात्मक होते पण हि आघाडी कार्तिक सरांनी लीलया पेलली.

◾ करमणुकीचा नॉनस्टॉप जल्लोष
भव्य स्टेज आणि 5000 नागरीक बसू शकतील इतका भव्य मंडप यंदाचे खास आकर्षण ठरला. करमणुकीचे एकापेक्षा एक गाजलेले कार्यक्रम रसिकांसाठी सादर करण्यात आले. • खेळ रंगला पैठणीचा • महाराष्ट्राचे लाडके विनोदवीर • डान्स जल्लोष – सिनेतारका नृत्य • झुंबा डान्स अश्या बहारदार कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली. स्वप्नील जोशी, पुष्कर श्रोत्री, श्रुती मराठे, संस्कृती बालगुडे, समीर चौगुले, गौरव, अश्या लोकप्रिय कलाकारांनी अफाट गर्दीची करमणूक केली, सोबतच अजित- सुजित, अक्षय घाणेकर यांच्या बहारदार गायकीने लोकांना मंत्रमुग्ध केले.

◾ मान्यवरांची भेट
उद्घाटन कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपस्थित झाले, त्यानंतर पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटिल, विश्व हिंदू परिषदेचे भारतीय सत्संग प्रमुख दादा वेदक, क्षेत्रप्रचारक अण्णा पंडित, पद्मश्री दादासाहेब इदाते, राष्ट्रपती शौर्य पुरस्कार प्राप्त आयुष तापकीर, आंतरराष्ट्रीय गिर्यारोक गिरीजा लांडगे, शाहीर चेतन हिंगे, हिंदकेसरी अभिजित कटके, भाजपा महिला आघाडी अध्यक्षा चित्रा वाघ, कालीचरण महाराज, हिंदू राष्ट्रसेनेचे संस्थापक धनंजय देसाई, गोरक्षक शिवशंकर स्वामी, संभाजी भिडे गुरूजी, शिवाजीदादा आढळराव पाटील, राहुलदादा कुल, कांचन कुल, शरददादा सोनवणे, सौ. उमाताई खापरे, बाळा भेगडे, जगदीश मुळीक, पद्मश्री गिरीशजी प्रभुणे, अमरजी साबळे, शंकरशेठ जगताप आदी मान्यवरांनी उपस्थिती लावली. समारोपाच्या कार्यक्रमाला दस्तुरखुद्द राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी हजेरी लावत उपस्थित जनसमुदायाला जोषपूर्ण भाषणाने उल्हसित केले. सर्व मान्यवरांना रामाची सुरेख मूर्ती देउन गौरवण्यात आले.

  • मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे भाषण इथे ऐका https://fb.watch/ipI_IV83h-/
  • उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे भाषण इथे ऐका https://fb.watch/ipJCPIywrs/

◾ विवीध कला कौशल्यांना वाव देण्यासाठी स्पर्धा
यंदा प्रथमच महोत्सवात विविध स्पर्धांचे आयोजन केले होते. 25 पेक्षा जास्त स्पर्धांचे नियोजन झाले होते परंतु काही कारणास्तव फक्त 15 स्पर्धा आपण घेऊ शकलो. महिला भगिनींसाठी फॅशन शो, मेकअप, फिटनेस, रांगोळी, मंगळागौर, एकपात्री, गायन, कविता, शिवकालीन मर्दानी खेळ तसेच शालेय विद्यार्थ्यांसाठी फॅन्सी ड्रेस, स्मरणशक्ती, चित्रकला आदी स्पर्धा घेण्यात आला. यंदा प्रथमच 8 ऑनलाईन स्पर्धांचा समावेश करण्यात आला. स्वच्छ हाऊसिंग सोसायटी, चित्रकला, फोटोग्राफी, फूड ब्लॉगर, कराओके, रील स्टार, शॉटफिल्म या स्पर्धांचा समावेश होता. सर्व स्पर्धांच्या समन्वयकांनी, परीक्षकांनी मागच्या काही दिवसांत अपार मेहनत घेऊन स्पर्धा यशस्वी पार पाडल्या त्याबद्दल सर्वांचे अभिनंदन. सर्व विजेत्यांना समारोपाच्या दिवशी ट्रॉफी, प्रमाणपत्र, रोख रक्कम देउन गौरवण्यात आले तसेच स्पर्धा आयोजक, परीक्षक यांचा सत्कार करण्यात आला.

◾पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून #परीक्षापेचर्चा !
पिंपरी चिंचवड मधील 5000 पेक्षा जास्त मुलांसोबत परीक्षेबाबत देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी थेट संवाद साधला. महेश दादांच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांसाठी या खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची लिंक: https://fb.watch/ipIWFIFMl3/?mibextid=6aamW6

◾ सरकार आपल्या भेटीला
सरकारी विभाग आणि नागरिक यामध्ये दुवा साधण्यासाठी 15 पेक्षा अधिक सरकारी स्टॉलचे आयोजन करण्यात आले. जत्रेच्या मार्फत नागरीक आणि सरकार यांच्यात दुवा साधण्याचा महेश दादांचा उद्देश होता. पिंपरी चिंचवड महानगरपालिका, PMPML, म्हाडा, RTO, पोस्ट ऑफिस, महावितरण, BSNL, रेशनींग ऑफिस, पोलीस आयुक्तालय, पंचायत समिती आदी सरकारी विभागांनी भाग घेत नागरिकांना सरकारी योजना, सेवा याबद्दल माहिती दिली.

◾ सामाजिक व अध्यात्मिक संस्थांचा सहभाग
शहरातील 35 पेक्षा अधिक सामाजिक व अध्यात्मिक संस्थांना स्टॉल देण्यात आले. त्याद्वारे विक्री, सभासद नोंदणी, जनजागृती करण्यात आली. अविरत श्रमदान , फोटोग्राफी सोसायटी ऑफ इंडिया, पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, पुनरुत्थाम गुरुकुलम, चिंचवड, तात्यासाहेब बापट स्मृती समिती, प्रकाशालय भोसरी, गो-सेवा विभाग, पिंपरी चिंचवड, पर्यावरण गतीविधी, भारतीय विचार साधना, घरकुल हॅंडीकॅप हेल्प ट्रस्ट, सेवा संकल्प प्रतिष्ठान, सेवादीप, रेलफॉर फाउंडेशन, मंथन फाउंडेशन, सह्याद्री प्रतिष्ठान, संस्कार भारती, TAYAOA कोल्हापूर, कार्डिअन करेक्ट फाउंडेशन, जुन्नर, डोनेट एड सोसायटी आदी संस्था सहभागी झाल्या

◾ #PCMCEatOuts द्वारे फूड स्टॉल व फूड ब्लॉगर स्पर्धेचे आयोजन
फूड फेस्टिवल हा जत्रेचा आत्मा. यावेळेस सुमारे 1000 स्टॉलपैकी 500 स्टॉल हे खाद्यपदार्थांचे होते. महाराष्ट्रातील विवीध भागांची खासियत असलेले व्हेज नॉनव्हेज असे हजारो पदार्थ खवय्यांना चाखायला उपलब्ध होते. यंदा प्रथमच PCMC Eat Outs या खाद्यप्रेमींच्या लोकप्रिय फेसबुक ग्रुपव्दारे दोन स्पर्धा घेण्यात आल्या 1) Food Stall Contest 2) Food Blogger Contest. ज्याला नागरीकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.

1) Food Stall Contest: 500 पैकी 150 स्टॉलधारकांनी स्पर्धेत भाग घेतला. पदार्थाची चव, स्टॉलची मांडणी, प्रेझेंटेशन नाविन्यता, नागरीकांचा प्रतिसाद हा निकषांवर मूल्यांकन करण्यात आले. स्टॉलधारकांशी बोलताना जाणवले की अनेक महिला त्यांचा व्यवसाय घरातून चालवतात. यामागे त्यांची प्रचंड मेहनत, आवड आहे. व्यावसायिक स्पर्धेत टिकून राहण्यासाठी नवनवीन पदार्थांचे कॉम्बिनेशन गिऱ्हाईकांना देण्याचा ते प्रयत्न करतात.

2) Food Blogger Contest: फूड स्टॉल स्पर्धेसोबतच PCMC Eat Outs चा आत्मा असलेले खाद्यप्रेमी मंडळींसाठी Food Blogger स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. 50 पेक्षा अधिक ब्लॉगरने स्पर्धेत भाग घेत जत्रेतील खाद्यपदार्थ नेटिझन्सपर्यंत पोहचवले. लिहण्याचे कौशल्य आणि मांडणी या निकषावर मूल्यांकन करण्यात आले.

विविध महिला बचत गटांना व्यवसायाला मदत व्हावी या उद्देशाने PCMC Eat Outs ग्रुपद्वारे स्टॉलची फेसबुकवर मोफत जाहिरात करण्यात आली. त्यांना व्यवसायवृद्धीसाठी टिप्स देण्यात आल्या. इतक्या मोठ्या महोत्सवात स्पर्धा आयोजनाची संधी दिल्याबद्दल ॲडमिन टीम अमोल देशपांडे, शोएब शेख, पंकज कराड यांनी महेश दादांचे आभार मानले. तुम्ही जर स्वतःला खाद्यप्रेमी / Foodie मानत असाल तर आवर्जून हा ग्रुप जॉईन करा – PCMC Eat Outs #PCMCEatOuts

◾पोषण परसबाग मॉडेल व तृणधान्यांपासून बनवलेल्या पदार्थांचा स्टॉल
सोलापूरचे ख्यातनाम शेतीतज्ञ गुरुनाथ भांगे यांचे एक गुंठ्यांतील पोषण परसबाग मॉडेल ग्रामसंस्कृती मध्ये साकारण्यात आले. शहरी नागरिकांना छोट्याशा जागेमध्ये 30 पेक्षा जास्त भाजीपाला कसा पिकवता येईल याचे यशस्वी मॉडेल पाहता आले. जत्रा सुरू होण्यास कमी दिवस उरले असताना मी गुरूनाथ यांना संपर्क केला, व्यस्त कामकाजातून वेळ काढून त्यांनी त्यांचे परसबाग मॉडेल दाखवण्यास होकार दिला याचा फार आनंद झाला. याचबरोबरीने त्यांनी संशोधन करून विकसित केलेली तृणधान्यांपासून तयार केलेली आरोग्यदायी खाद्यपदार्थ आईच्या सुयश महिला बचत गटामार्फत स्टॉलवर विक्रीला ठेवले होते. शेवगा, गवती चहा पावडर, भाजीपाल्यापासून बनवलेल्या 23 प्रकारच्या शेवया, ज्वारीचे बिस्किटे, ज्वारीचा चिवडा असे खाद्यपदार्थ विक्रिसाठी ठेवले होते. तृणधान्यापासून असेही पदार्थ बनवता येतात हे प्रथमच ऐकले. नेहमी विकत घेतो त्यापेक्षा वेगळे जरी असले तरी नागरिकांनी गवती चहा, बिस्कीट, चिवडा प्रत्यक्ष चाखून पाहिल्यावर त्यांना ते फार आवडले. यानिमित्ताने आईच्या बचत गटाला एक नवीन व्यवसाय संधी मिळाली. लवकरच यावर विस्तृत लिहिणार आहे.

◾ सोशल मीडियाचा पुरेपूर वापर
जशी इंद्रायणी थडी मैदानावर गाजत होती तसेच तिचा डंका सोशल मीडियावर फार दूर दूर पर्यंत वाजत होता. Views चा आकडा कोटींच्या घरात गेला. फेसबूक, इंस्टाग्राम, ट्विटर, गुगल या सर्व समाज माध्यमांवर लोक भरभरून इंद्रायणी थडी विषयी पोस्ट करत होते. ज्यांना प्रत्यक्ष येणे जमले नाही त्यांनी फेसबूक लाईव्ह द्वारे जत्रेचे सर्व क्षण अनुभवले. #IndrayaniThadi2023 आणि #MaheshLandge हे हॅशटॅग ट्रेंडिंगवर होते. नेटिझन्सचा सध्याचा आवडता प्रकार म्हणजे Reels. अनेक लोकांनी क्रिएटिव्ह reels बनवून जत्रा सर्वदूर पोहचवली. पिंपरी चिंचवड फर्स्ट या फेसबुक ग्रुपने खास Reel Star हि स्पर्धा आयोजित केली त्याला युवा वर्गाचा चांगला प्रतिसाद मिळाला. अगदी 30 सेकंड्स मध्ये जत्रा कशी होती हे जाणून घ्यायचे असेल तर हा Reel पहा – https://bit.ly/it23-raunak-reel

◾ सोयीसुविधांचे परफेक्ट नियोजन
इतक्या मोठ्या महोत्सवाचे नियोजन व अंमलबजावणी करणे फारच जोखमीचे होते परंतु महेश दादांच्या टीमने ते यशस्वीरित्या पार पाडले. खाद्यपदार्थांच्या स्टॉलसाठी जेवण बनवण्यासाठी स्टॉलबाहेर जागा, पाण्यासाठी वेगळी लाईन आणि ठीकठिकाणी नळाची सोय करण्यात आली. स्टॉलमध्ये कचरा होउ नये यासाठी ठिकठिकाणी Dustbin ठेवले होते. प्रत्येक जागेची साफसफाई सफाई कर्मचाऱ्यांमार्फत होत होती.

◾सुरक्षेची, पार्किंगची, पोलीस बंदोबस्ताची चोख व्यवस्था
सुरक्षेसाठी • 90 पेक्षा अधिक CCTV द्वारे 24X7 देखरेख • 120 पोलीस अधिकारी व 22 वाहतूक पोलीस तैनात • 300 पेक्षा अधिक स्वयंसेवकांची फौज तत्पर मदतीसाठी उपलब्ध होती. पार्किंग व्यवस्थेची विशेष काळजी घेण्यात आली. चारचाकी वाहनांसाठी 8 पार्कींग झोन निर्माण केले ज्याची एकत्रित क्षमता 1500 गाड्या होती तसेच 5000 पेक्षा जास्त दोनचाकी वाहनांसाठी पार्किंग उपलब्ध होते. वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी जत्रा स्थळाच्या भोवती चालण्यासाठी पदपथ आरक्षित करण्यात आले. वाहतूक पोलीसांचे विशेष कौतुक, त्यांनी बाह्य परिसरातील रस्त्यांवर चोख बंदोबस्त ठेऊन वाहतूकोंडी होउन दिली नाही. तसेच प्रवेशाच्या (Entry Exit) ठिकाणी लोकांची हालचाल नियंत्रीत केल्याने चेंगराचेंगरी झाली नाही.

◾ जिथे कमी तिथे आम्ही
सर्व स्वयंसेवक त्यांना नेमून दिलेली जबाबदारी योग्यपणे पार पाडत होते पण जत्रा सुरू असताना अनेक छोट्या छोट्या कामांमध्ये जिथे कमी तिथे आम्ही या उक्तीप्रमाणे प्रत्येक जण कार्यरत होता. प्रत्येक स्टॉल मध्ये काय हवं नको, त्यांच्या समस्या सोडवणे, कुठे बिघाड झाल्यास, व्यवस्थेत त्रुटी आढळल्यास कोअर टीम तत्काळ दखल घेत होती. Entry Exit वर गर्दीला आवरणे, चौकशी कक्षात बसून ध्वनीक्षेपकावरून सूचना देणे, हरवलेल्या मुलाना सुखरूप त्यांच्या आई बाबांपर्यंत पोहचवणे, आलेल्या मान्यवरांना माहिती देणे अश्या असंख्य कामातून जत्रा माझ्यासाठी घर बनली होती. आठही हॉलमध्ये फेरफटका मारुन पाहणी करताना दगदग झाली तरी त्याचा त्रास होत नव्हता. जाता जाता वाटेत पडलेली प्लॅस्टिकची बाटली उचलून dustbin मध्ये टाकणे, मॅटिंग नीट करणे अशी कामेही लाज न बाळगता सहज केली गेली कारण हि जत्रा माझी आहे असे त्यामागचे भाव.

◾ तीन वर्षांचा आढावा
आयोजनाचे यंदाचे हे तिसरे वर्ष 2019, 2020 नंतर 2023 साली हि जत्रा भोसरी येथे भरली. कोरोनामुळे मधली दोन वर्षे जत्रा भरवता आली नाही.

  • दर्शक: 2019 (5 लाख) 2020 (6.5 लाख) 2023 (24+ लाख) • स्टॉल: 2019 (580) 2020 (800) 2023 (1000) • उलाढाल: 2019 (4.5 कोटी) 2020 (7 कोटी) 2023 (7.5 कोटी) हे इतके मोठमोठे आकडे गाठणे केवळ महेश दादांमुळे शक्य झाले. दरवर्षी एक नवा रेकॉर्ड प्रस्थापित केल्यावर तो पुढच्या वर्षी मोडला जाण्याची किमया केवळ दादाच करू शकतात. जणूकाही त्यांची स्पर्धा स्वतःशीच असते. समारोपाच्या दिवशी आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले तसे “हा महेश दादा काहीही करू शकतो” म्हणजेच कोणतीही अशक्यप्राय गोष्ट शक्य करून दाखवण्याची धमक दादामध्ये आहे.

जत्रेबद्दलाचा तुमचा अनुभव कसा होता. जरुर कळवा आणि हो महेश दादा, इंद्रायणी थडीच्या पेजला टॅग करायला विसरू नका @maheshklandage @indrayanithadi

एव्हढे लिहून इथेच थांबतो ✍️
] अनमोल [

IndrayaniThadi2023 #IndrayaniThadi #MaheshLandge #PimpriChinchwad #Bhosari #Pune #PCMCFirst #इंद्रायणीथडी #जत्रा #foodfestival #punefoodie #pcmcfoodie #punefoodblogger #punefoodlovers Mahesh Landge Indrayani Thadi – 2023 Indrayani Thadi Pimpri Chinchwad First #PCMCFirst आम्ही पिंपरी-चिंचवडकर PCMC Eat Outs #PCMCEatOuts

यावर आपले मत नोंदवा