दाटली नीज या दिशातूनी, पाडसा निजतोस ना रे…

गाणे गायला आवडत जरी असले तरी त्यातले संपूर्ण ज्ञान नसले कि होते फजिती! मागे बायकोच्या डोहाळ जेवणाच्या कार्यक्रमात खास अंगाई गीत गाण्यासाठी आईने तिच्या मैत्रिणीला बोलावले होते. उत्साही मला सुद्धा ‘नीज माझ्या नंदलाला’ गायचा मोह आवरता आला नाही… त्याच उत्साहात पुढे ‘तरुण आहे रात्र अजूनि’ हे गायला सुरवात करणार तेवढ्यात आईच्या मैत्रिणीने हटकले, अरेsss हे कुठले गाणे गातोय! …ओहो खरेतर शब्दातून समजते गाणे कोणत्या धाटणीचे आहे पण चाल अशी काही आहे की ते अंगाई गीतच वाटायचे. समजूनही न उमजणे यालाच म्हणत असावे… 🙂

तेव्हा ठरवले कि त्याच चालीत अंगाई गीताला साजेसे बोल बसवायचे. दोन कडवी जमल्या असे वाटते. पहिल्या दोन ओरिजिनल व नंतरच्या बनवलेल्या. आणि हो… याचा एक फायदा आहे – ‘एका दगडात दोन पक्षी’. कसे काय?? एकाला जागायला तर दुसऱ्याला झोपायला. आता कोणासाठी ते तुम्ही ठरवा 😉


तरुण आहे रात्र अजूनि, राजसा निजलास का रे
एवढयातच त्या कुशीवर, तू असा वळलास का रे

अजूनही विझल्या न गगनी, तारकांच्या दीपमाळा
अजून मी विझले कुठे रे, हाय तू विझलास का रे


दाटली नीज या दिशातूनी, पाडसा निजतोस ना रे
दूर त्या तिमिरात चंद्र, बघ कसा निजतो आहे रे…

परतुनी पक्षी नभातुनी, घरट्याची ओढ त्यांना
मंद वारा त्या किनारी, बघ कसा विसावला रे…


शंकर महादेवन यांच्या आवाजातील गाणे खालील दुव्यावर ऐका

यावर आपले मत नोंदवा