घूमर फिल्म रिव्ह्यू | माझ्या क्रिकेटच्या आठवणी

‘घूमर’ चित्रपटाचा प्रीमियर पाण्याची संधी मिळाली. बायकोच्या Genepath कंपनीने खास शोचे सिटी प्राईड कोथरूड येथे आयोजन केले होते. नावावरून नृत्याशी संबंध वाटत होता, पण चित्रपट सुरू होण्याआधी कळाले की विषय क्रिकेट आहे. क्रिकेटवर आजपर्यंत अनेक चित्रपट येऊन गेलेत त्यामुळे त्यात नवीन एकाची भर आणि premier शो पाहून आलो असे मिरवायला मिळेल असा विचार करून चित्रपट सुरू होण्याची वाट पाहू लागलो… सुरवातीस चित्रपट पकड घेत नाही, शॉर्ट फिल्म पाहायला लागते की काय असा विचार डोकावला. परंतु थोड्याच वेळात अभिषेक बच्चनची एन्ट्री होते आणि त्यानंतर जसे एखादा हरत आलेला क्रिकेट सामना अचानक कलाटणी घेतो त्याप्रमाणे चित्रपट एक जबरदस्त वळण घेतो आणि त्यानंतर अंगावर शहारे आणणारे, अभिनयाचा कस लागणारे, उत्कंठावर्धक दृश्ये समोर येऊ लागतात…

R Balki चित्रपटाचे दिग्दर्शक. त्यांचे गाजलेले चित्रपट English Vinglish, Padman, Mission Mangal अश्या प्रतिभावंत दिग्दर्शकाची अजून एक सुंदर चित्रकृती. अभिषेक बच्चनचा दमदार अभिनय, जबरदस्त संवादफेक. मुख्य नायिका Saiyami Kher अभिनय थक्क करणारा आहे. खरच आपण नायिकेला पाहतोय की एखाद्या मुरलेल्या खेळाडूला पाहतोय असा संभ्रम निर्माण होतो. शो नंतर एकाने तिच्या क्रिकेट स्किलबद्दल विचारले तेव्हा तिने मला महाराष्ट्र क्रिकेटमध्ये निवडीसाठी जायला आवडेल असे सांगितले. हा चित्रपट पाहून खुद्द मास्तर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला प्रश्न पडला होता की यामध्ये VFX चा वापर केलाय का? मला आवडलेला डायलॉग ‘लेफ्ट से भी ANINA राईटसे भी ANINA’. मोटिव्हेशनल डायलॉगची रेलचेल आहे… तेव्हा माझ्याकडून Must Watch 👍

एका विशेष कारणाने हा चित्रपट माझ्यासाठी खास होता कारण घुमर म्हणजे स्पिन बॉलिंग (फिरकी गोलंदाजी) 🏏. क्रिकेटमध्ये तशी ही जमात अल्पसंख्यांक आहे. मला आठवते शाळेत सहावीत आम्ही फुलपीच क्रिकेट खेळायला लागलो आणि सुरुवातीपासूनच माझा ओढा स्पिन बॉलिंगकडे होता. आधी लेग स्पिन आणि कॉलेजमध्ये गेल्यावर ऑफ स्पिन करू लागलो. मित्र मला फेकी म्हणायचे पण नंतर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या कोचने माझ्या बॉलिंग स्टाईलची निर्दोष मुक्तता केली होती 😎 टेनिस बॉलवरील सामने असायचे त्यामुळे बॉलिंगसोबत मला विकेट किपिंग सुद्धा आवडायची आणि विशेष म्हणजे किपरने बॉलिंग करू असा नियम नसल्याने दोन्हीचा आनंद घेता येत होता. इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रथम वर्षी इंटर डिपार्टमेंट सामन्यांमध्ये विकेट किपिंग इतरांना चांगली जमत नसल्याने ती जबाबदारी माझ्यावरच आली पण पुढे करियरवर हाच शिक्का बसेल याची कल्पना नव्हती. इंटर डिपार्टमेंट Tournament आम्ही जिंकली आणि आणि त्यानंतर लागलीच कॉलेजची टीम निवडण्यात आली. माझा performace चांगला झाल्याने कॉलेज टीमचा विकेट किपर म्हणून निवड झाली आणि बॉलिंग करण्याचे मार्ग बंद झाले… पुढे इंटर कंपनी मॅचेस मध्येही कीपर म्हणूनच खेळावे लागले. Cognizant मध्ये असताना मात्र निवडीसाठी जाताना मी किपर होतो हे लपवले आणि स्पिन बॉलर म्हणून सिलेक्ट झालो. प्रॅक्टिस सेशन मध्ये MCA च्या कोचने माझी Action unique आहे तेव्हा प्रॅक्टिस सोडू नको असा सल्ला दिला होता. आवडीच्या क्षेत्रात पुन्हा पदार्पण करता आले याचे समाधान वाटले… शेवटचे खेळलो L&T Infotech मध्ये. आयटी करियरची गाडी पुढे जाताना क्रिकेट मागे पडत गेले… आता कधीतरी घराजवळील धिंग्रा मैदावर गेल्यावर कोणी खेळताना दिसले की मध्ये घुसून काही बॉल टाकायचे समाधान मिळवायचे बस्स… 🙂

Ghoomer R. Balki Saiyami Kher Abhishek Bachchan Vikram Sathaye #Cricket #Spinner