अथांग समुद्राचा निळाशार पसारा तू,
माझ्या जीवनाच्या कश्तीला मिळालेला किनारा तू… (उगीचच प्रेम वेडा बिडा)
हरभजन ने चुकून टाकलेला दुसरा तू,
नो बॉल वर विकेट घेणारा नेहरा तू… (कधी कधी चुकून मटका लागतो ना…)
खोलवर मनामध्ये साठवलेली आठवण तू,
त्याच आठवणींच्या गुंत्यात ठेवलस जखडून तू… (सस्पेन्स, गूढ किंवा रहस्यमय)
त्या रात्री मला पडलेलं सुंदर स्वप्न तू,
त्या स्वप्नाची कधीच संपू न वाटणारी रात्र तू…(परत प्रेम वेडा… नाही, सकाळी उठून कामावर जायचा घोर कंटाळा 😉 )
का अशी माझ्यापासून गेलीस दूर तू?
जगण्याचा आधारच जणू हिरावलास तू… (विरह 😦 )
खिन्न रात्री माझ्या अन उमेदीचे शब्द दिलेस तू,
आता कसा छान वाटतंय Thanks to you… (आनंदी आनंद चहूकडे 🙂 )
खवळलेल्या समुद्रावर स्वार होऊन मार्गस्थ जहाज तू,
तर कधी त्याच्या रौद्रावताराला भिक न घालता स्थितप्रज्ञ किनारा तू… (Balance Personality)
…….अनमोल
दुनोळ्या हा काव्यप्रकार दीपक परुळेकर याच्या ‘मनाचे बांधकाम’ या ब्लॉग मध्ये पहिल्यांदा पाहिला आणि मग माझा पण एक प्रयत्न घुसडण्याचा 😉 वरील प्रयत्न केला…
फुल टू भारी दुनोळ्या येथे वाचा
Khup chhan vatale vachun 🙂
Tooo good!!!!