सौख्य प्रीतीचे,
बंध रेशमाचे,
नाते आपुल्या दोघांचे
आज अवघे युगा युगांचे!
जणू आकाशाचा निळाशार पसारा,
जणू नदीचा शांत किनारा,
जणू काजळाची गर्द छाया,
जणू धुक्यात हरवलेल्या वाटा,
चाहुली ह्या अश्या कित्येक, आज भासवी मला
भावना अश्या ओथंबलेल्या…
जिव्हाळाच्या त्या निवांत क्षणी…
स्पर्शाने चिंब भिजलेल्या…
वाटेवरील त्या कोमल आठवणी…
जपावे चिरकाल हे सारे, मन म्हणाले मला
हृदयातील सप्त सुरांचे,
मन-मनातील भावविश्वाचे,
नाते आपुल्या दोघांचे
आज अवघे युगा युगांचे!
मराठीला नवीन कवी मिळालाय खुप छान कवीता आहेत आपल्या सारखा कवी मराठीला हवा होता आणि तो अमोल या नावानी मिळालाय
mitra,
ekdum mast!!!!
Zakaaaas ….
Marathi la navin kavi milalay 🙂
Apratim kavita ahe.
Amol evdha chan kavya karto he kharach mahit navhta.. khup chan.. keep it up.
छान आहे.