ते फूल होते एकटे

ते फूल होते एकटे
कड्या कपारी मध्ये उभे ठाकलेले
रुक्ष सम वनात डौलात झुलणारे…ते फूल होते एकटे
झेलत लहरी पावसाच्या
वारयाशीही दोन हात करणारे…ते फूल होते एकटे
बघताच मन प्रफुल्ल करणारे
नव्या उमेदीची झालर देणारे…ते फूल होते एकटे
अखंड प्रयास रुक्षता मिटवण्याचा
पण चुणूक त्यास असंभवतेची
कारण मित्रा…ते फूल अजूनही आहे एकटेच…!
अनमोल…
————————————————————————————————————————————————————-
[कवितेच्या माध्यमातून समाज सेवकाची जीवन गाथा रेखाटण्याचा प्रयत्न केला आहे, अर्थात कवितेची ही चार कडवी समाज सेवकाच्या  व्यापक कार्यक्षेत्राला सामावू शकत नाही. माझे भाग्य आणि  आनंद  इतकाच की केलेली पहिलीच कविता ही  ‘समाजसेवा’ या विषयाशी निगडीत आहे. काही कारणास्तव कविता उशिराने प्रकाशित  करत  आहे]
सारांश…
कडवे १: समाज सेवकाचे  समाजामधील  स्थान,  स्थान म्हणाल तर अतिशय दुर्गम.
कडवे २: त्याच्या  वाट्याला  आलेली  प्रतिकूल  परिस्थिती  आणि  अश्यातही परिस्थितीशी दोन हात करण्याची त्याच्या अंगात असलेली उर्मी. तग धरून राहिल्यानेच हा इतरांसाठी मार्गदर्शक बनू  शकला.
कडवे ३: नवी उमेद, नवी आशा, जगण्यातील आनंद अश्या कित्येक गोष्टी हा इतरांना वाटत असतो.
कडवे ४: शेवटी मला ठळक पणे  नमूद करावेसे वाटते कि भोवतालची परिस्थिती बदलायला निघालेला, द्रुढ निश्चयी असणारा, अडचणींना  न  जुमानणारा असा  हा इथे मात्र हतबल होतो  कारण आज तो एकटाच झगडतो आहे आणि समोर कामाचा व्याप प्रचंड आहे.
मित्रा असे संबोधून तो तुमच्याजवळ अत्यंत कळकळीने विनंती करतो आहे “सहभागी व्हा…साथ द्या…!”  “Join us…Support us…!”
————————————————————————————————————————————————————-

7 thoughts on “ते फूल होते एकटे

    1. तो मी नव्हेच…हि गाथा fulltime समाज सेवकाची आहे, माझ्यासारखा parttime तो काय? बोले तो, आम्ही पडलो Consultant, सल्ले देण्यात पुढे, पण नक्कीच यापुढे काहीतरी अर्थपूर्ण काम करण्याचा प्रयत्न राहील आणि तेही तुम्हाला बरोबर घेऊन. – Roll no 38

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s