वेळ सकाळी १०, office ला निघतच होतो आणि ह्या (फोटो मधल्या) इसमाचे दर्शन झाले. “भंगारवाला” असे बिरूद मिरवणारा हा, तुमच्या आमच्या

दैनंदिन परीचयातला. विशिष्ट प्रकारे हेल देऊन(च) आपल्या आगमनाची सर्वांना तो जाणीव करून देतो. पत्रे, डबे, बाटल्या, लोखंडी वस्तू, रद्दी अशी नानाविध आभूषणे तो आपल्या रथामध्ये सामावून घेतो. काळानुरूप आता ह्याचा रथात जागा पटकावली आहे ती संगणक (computer) ह्या विजाणू उपकरणाने. खरच या IT युगात ती वेळ दूर नाही जेव्हा हा इसम त्याची आरोळी अशाप्रकारे देईल ….ई भंगारवालेएएएएsss !! तर हो पुढे, मी माझ्या bike ला kick मारतच होतो आणि एकदम डोक्यात त्याचा फोटो काढण्याचा विचार आला. लागलीच खिशातुन mobile काढला आणि फोटो घेण्यासाठी साठी पुढे सरसावलो.
त्याच्याशी झालेला संवाद खालील प्रमाणे:
मी: अरे मित्रा एक फोटो घेऊ दे
तो: साहेब काय झालं?
मी: हे (कॉम्प्युटर) घेऊन चालायास ना, त्याचा फोटो हवे आहे
तो: साहेब चुकलं का? हे घेऊन जाणे चुकीच आहे का?
मी: (हसून) अरे बाबा त्यात चूक काही नाही मला फक्त फोटो हवा आहे.
मी: इकडे बघू नकोस, समोर बघ…नुसता उभा नको, गाडी ढकलतोय असे दाखव
मी: ठिक आहे, …”Click”
तो: साहेब तुम्ही हा फोटो पेपरात देणार का?
मी: काय?….हो
तो: कुठल्या?
मी: ठरवलं नाही
तो: उद्याच्या पेपरात का?
मी: हम्म…
तो: साहेब काही होणार नाही ना मला
मी: (त्रासून) नाही रे…
मी: (मनात) केवढे प्रश्न…देवा!
बिच्यार्याचे हातावरचे पोट त्याला नाही प्रसिद्धीचा सोस.
evade alankaric kase suchle