पहिल्या वाढदिवसाच्या तुला मन:पूर्वक शुभेच्छा…!!

अहो आज माझा ‘अनमोल’ एका वर्षाचा झाला ना. खरच खूप मस्त वाटतंय अभिनंदन करताना आणि स्वीकारताना. इथून मागे बघताना अस काही करू शकलो यावर विश्वासच बसत नाही. माझे शिक्षण तसे मराठी माध्यमातून झालेले, पण शालांत परीक्षेनंतर क्वचितच मराठी लिहिण्याचा संबंध आलेला. अशा परिस्थितीत मराठी मध्ये लेख, कविता लिहू शकेल याचा कधी विचारच केला नव्हता. शब्दांची मोड तोड करून काहीतरी नवीन बनवता येते बस् एवढेच माहित होते पण जेव्हा ब्लॉग सुरु करण्याचा विचार झाला तेव्हा थोडासा लिखाणाबाबत गंभीर विचार करायला सुरवात केला. मागील एका वर्षात माझे मराठी थोडेसे सुधारण्याबरोबर, इतरांचे ब्लॉग वाचायची गोडी निर्माण झाली.. खरच पब्लिक किती भन्नाट लिहितात. या मागील प्रवासात माझ्या ब्लॉग ला प्रतिसाद देणाऱ्यांचे तसेच मला वेळोवेळी मार्गदर्शन करणाऱ्यांचे धन्यवाद…
तर आज तुम्हाला वाढदिवसाची पार्टी म्हणून एक पोस्ट तर व्हायलाच पाहिजे… या नंतरची पोस्ट आज लगेचच पहा!
-अमोल देशपांडे (अनमोल)