मावळतीचे रंग मनोहारी लेवून दिशांचा हा साज
तो पहा निघालाय रवी जणू दिवस बुडवायला आज
वाऱ्याबरोबर वाहत आहे गंधारलेली गंधता
तो पहा निघालाय रवी जणू दिवस बुडवायला आज
वाऱ्याबरोबर वाहत आहे गंधारलेली गंधता
कुठून बरे येई गुरांची किणकिणणारी नादमयता?
सभोवताल भासे जणू हिरव्या हिरव्या गालीचासम
आणिक डौलात झुलणारे रानफुले जणू माणिक मोत्यांसम
आणिक डौलात झुलणारे रानफुले जणू माणिक मोत्यांसम
ना तो गोंगाट भोवती ना कोणाची घाईगर्दी
इथे खुद्द लोलकानेही विसरावी गती स्वतःची
तिथे भौतिक परिसिमेत बंदिस्त आहे वाऱ्याचे अस्तित्व
इथे मात्र मुक्तपणे संचार हाच जणू याचा धर्म
इथे खुद्द लोलकानेही विसरावी गती स्वतःची
तिथे भौतिक परिसिमेत बंदिस्त आहे वाऱ्याचे अस्तित्व
इथे मात्र मुक्तपणे संचार हाच जणू याचा धर्म
झरझर कापत रस्ता, त्या वळणावर गाडी अमुची सुसाट
झरझर कापत रस्ता, त्या वळणावर गाडी अमुची सुसाट
वेळ आहे आता अंधाराच्या कवेत शिरण्याची,
अन् निशब्द शांतता अनुभवण्याची……
झरझर कापत रस्ता, त्या वळणावर गाडी अमुची सुसाट
वेळ आहे आता अंधाराच्या कवेत शिरण्याची,
अन् निशब्द शांतता अनुभवण्याची……
एका निवांत क्षणी असच काहीसं सुचलेलं…
अनमोल…