नववर्षाभिनंदन 2012

 

सलाम सरत्या वर्षाला… 2011
दिलेस तू सामर्थ्य आणि विश्वास, तेव्हा लढलो आम्ही भ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध
दिलीस विचारांची ताकद, तेव्हा ओळखू शकलो सरकारची अयोग्य नीती
दिलेस तू Social Network चे हत्यार, तेव्हा भाग पाडले आमची मते ऐकण्यास
दाखवलीस नवी दिशा, तेव्हा वाटले नक्कीच येणारे वर्ष घेऊन येईल उज्वल भवितव्य

 

स्वागत नव्या वर्षाचे… 2012
संघटीत होऊन समाजकार्यासाठी झोकून देण्यास युवाशक्ती आता सज्ज
भ्रष्टाचारमुक्त भारत आमच्यासाठी यापुढे स्वप्न नव्हे वास्तव
या लोकशाहीची जनता खरी मालक हि खुणगाठ बांधून पक्की
मतांचे मोल जाणून नव्या वर्षात खरया लोकनायकाची निवड आता नक्की

 

नवीन वर्ष तुम्हाला धमाल सुखाचे जावो… 🙂

Happy Birthday!! अनमोल…

पहिल्या वाढदिवसाच्या तुला मन:पूर्वक शुभेच्छा…!!

My Blog Birthday

अहो आज माझा ‘अनमोल’ एका वर्षाचा झाला ना. खरच खूप मस्त वाटतंय अभिनंदन करताना आणि स्वीकारताना. इथून मागे बघताना अस काही करू शकलो यावर विश्वासच बसत नाही. माझे शिक्षण तसे मराठी माध्यमातून झालेले, पण शालांत परीक्षेनंतर क्वचितच मराठी लिहिण्याचा संबंध आलेला. अशा परिस्थितीत मराठी मध्ये लेख, कविता लिहू शकेल याचा कधी विचारच केला नव्हता. शब्दांची  मोड तोड करून काहीतरी नवीन बनवता येते बस् एवढेच माहित होते पण जेव्हा ब्लॉग सुरु करण्याचा विचार झाला तेव्हा थोडासा लिखाणाबाबत गंभीर विचार करायला सुरवात केला. मागील एका वर्षात माझे मराठी थोडेसे सुधारण्याबरोबर, इतरांचे ब्लॉग वाचायची गोडी निर्माण झाली.. खरच पब्लिक किती भन्नाट लिहितात. या मागील प्रवासात माझ्या ब्लॉग ला प्रतिसाद देणाऱ्यांचे तसेच मला वेळोवेळी मार्गदर्शन करणाऱ्यांचे धन्यवाद…

तर आज तुम्हाला वाढदिवसाची पार्टी म्हणून  एक पोस्ट तर व्हायलाच पाहिजे… या नंतरची पोस्ट आज लगेचच पहा!

-अमोल देशपांडे (अनमोल)

शुभेच्छा संदेश

१२ डिसेंबर, बाबांचा 53rd वाढदिवस…झटकन केलेला शुभेच्छा संदेश

वर्ष नवे, उल्हास नवा,
आकांक्षा आणि उमेदही नवा,
अश्या नव्याच्या नवलाईसाठी
आणि आयुष्याच्या नव्या inning साठी
आमच्या कडुन हार्दिक शुभेच्छा…!
————————————————-

मग हाच संदेश मी स्वतःच्या अक्षराने greeting card वर खालीलप्रमाणे लिहिला…

वर्ष नवे, उल्हास नवा,
आकांक्षा आणि उमेदही नवा,                    
अश्या नव्याच्या नवलाईसाठी          
आणि आयुष्याच्या नव्या inning साठी  
आमच्या कडुन हार्दिक शुभेच्छा..!