Category Archives: प्रेरणा

डिजीटल पिंपरी-चिंचवड काळाची गरज

डिजीटल इंडियाच्या धर्तीवर राज्य सरकारने डिजिटल महाराष्ट्राचा संकल्प मांडला आणि त्यादिशेने विविध कामांची सुरवात केली. केंद्र, राज्यसरकारच्या धोरणाला समांतर असे शहराचे धोरण महापालिकेने बनवले पाहिजे त्यामुळे केंद्र-राज्य-शहर तिन्ही पातळीवर सुसूत्रता येउन त्याचा थेट परिणाम सामान्य नागरिकांचे जीवन उंचावण्यात होईल अशी मला खात्री वाटते. ‘डिजिटल पिंपरी-चिंचवड’ असे संबोधून आपण हा विषय का व कसा महत्वाचा आहे यावर माहिती घेऊयात. केवळ महानगरपालिका गृहीत न धरता डिजिटल पिंपरी-चिंचवड उपक्रमात शहरातील सर्व शासकीय, निम-शासकीय सरकारी यंत्रणांचा सहभाग अपेक्षित आहे. जरी केंद्र/राज्य/शहर या वेगवेगळ्या पातळ्या असल्या, त्यांमध्ये विविध खाती असली तरी सामान्य नागरिकासाठी सरकार हे एकच असते. या नात्याने ‘डिजिटल पिंपरी-चिंचवड’ उपक्रमाची जबाबदारी पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे सोपवणे व्यवहार्य व सोयीचे ठरेल. Continue reading

Posted in प्रेरणा, माहिती, Uncategorized | Tagged , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , | यावर आपले मत नोंदवा

‘सारथी’चे दिवस …माझ्या नजरेतून

माझा फोन खणाणला. पलीकडून मित्र फोनवर उत्साहाच्या भरात “अरे अमोल झकास! मी माझ्या घरासमोरील रोडची तक्रार ‘सारथी’वर दिली आणि केवळ ३ दिवसात पिंपरी-चिंचवड पालिकेने तक्रारीवर समाधानकारक कारवाई केली!”. अनेकांना परिचित असलेले ‘सारथी’ नाव लवकरच पिंपरी चिंचवडच्या घराघरात पोहोचणार आहे. काय … Continue reading

Posted in अनुभव, प्रेरणा, माहिती, Uncategorized | Tagged , , , , , , , , | यावर आपले मत नोंदवा

महिला दिन विशेष – सुनिता देशपांडे

आठवत नाही नक्की कधी आईने (सुनिता देशपांडे) समाजकार्यात स्वतःला वाहून घेतले, मी नववीत होतो 1999 साली तेव्हाचे आठवते कामशेतला जाऊन आई खेड्यातील परिस्थितीने गरीब मुलींसाठी फर टॉंईजचे क्लास घेत होती, माझ्या लहान भावाला जसे कळायला लागले तेव्हा चूल-मुल यातून बाहेर पडत आईने … Continue reading

Posted in अनुभव, प्रेरणा, माहिती | Tagged , , , , , , | 3 प्रतिक्रिया

प्रेरणा

तुझ्यासाठीच रचली होती चारोळी जेव्हा, उमगले जणू काहितरी जमतेय तेव्हा जुळले एकमेकांत शब्द अन् भावना जेव्हा, ठरवले मनाशी लिहायचेच तेव्हा माझ्या ब्लॉग लिहिण्यामागची प्रेरणा: निमित्त होते तुला दिवाळी च्या शुभेछा देण्याचे आणि sms स्वतःच compose कर अशी तुझी अट घालण्याचे … Continue reading

Posted in प्रेरणा | Tagged | 6 प्रतिक्रिया