तुम्ही पुण्यातले नाही वाटतं

17/1/2012, सकाळी 11.15 पुणे स्टेशनलगत असलेल्या ST Stand वरून वाकडेवाडी, शिवाजीनगर कडे येताना रिक्षावाल्यांचा आलेला अनुभव

जवळपास 5 ते 6 रिक्षावाले direct 90 रुपयाची मागणी करत असताना, मी मीटर प्रमाणे चला म्हणल्यावर त्यांनी स्पष्ट शब्दात नकार दिला… काहीजणांनी  आम्ही  वाकडेवाडीला जात नाही असेही सांगितले. वैतागून थोडे पुढे चालत आलो तर Traffic Police दिसला, त्यांना मी विचारले जर रिक्षावाले मीटर प्रमाणे येत नसतील  तर तक्रार कोणाकडे करायची?  यावर तो  म्हणाला  “आमच्याकडेच…कोण नाही म्हणतो मीटर प्रमाणे… तुम्ही बसा त्या रिक्षामध्ये आणि माझ्या इथे थांबवा मग आपण कारवाई करू”  मी माघारी फिरलो आणि परत रिक्षात बसलो, तेवढयात माझ्या मागोमाग पोलीस पण रिक्षाजवळ आला, आता मात्र रिक्षावाल्याची पंचाईत झाली, पोलिसाने licence जप्त कारवाईचा इशारा देताच तो “साहेब मी कुठे नाही म्हणालो मीटरप्रमाणे सोडायला…” 

चरफडत का होईना मला मीटर प्रमाणे सोडण्यास निघालेल्या रिक्षावाल्याची प्रवासात धुसफूस चालूच होती… मला म्हणाला “रोज किती लोक येतात इथे पण तुमच्या सारखं कोणी मीटर मीटर करत नाही, तुम्ही पुण्यातले नाही वाटत” मी मनात विचार केला  …बहुदा  ह्याला भेटलेले  पुणेकर एक तर फार  श्रीमंत  असतील नाहीतर फार घाईवर आलेले असतील…असो… प्रश्न राहिला मी पुणेकर आहे का नाही? तर…आमचे पूर्वज थेट शिवाजी महाराजांच्या काळापासून पुणे परिसरात वास्तव्यास होते, ह्या इतक्या सबळ विधानावरून नक्कीच मी पुण्यातलाच असणार.. नाही का? पुणेकर होण्यासाठी बहुदा हा नवीन निकष असावा कि रिक्षावाल्याकडे मीटर प्रमाणे चल असे न म्हणणे 😉 … पु.ल. देशपांडे यांनी पुणेकर होण्यासाठी काय करावे लागेल यावर आधीच जगाला हसवलंय… पण पु.ल. असते तर नक्कीच तेही  रिक्षावाल्याच्या या उक्तीवर हसले असते… 🙂 

…ह्या महाभागाला हे सर्व कोण समजावत बसणार So जास्त वादात न पडता (पुणेरी बाणा न दाखवता)वाकडेवाडी आल्यावर मीटर प्रमाणे झालेले 39 रुपये त्याचा हातावर टेकवले आणि माझ्या कामासाठी मी पुढे चालता झालो. कुठे 90 आणि कुठे 39 !! मात्र…गडबडीत त्या Traffic पोलिसाचे  नाव  विचारायला विसरलो… Really impressed with his prompt responce! 

त्याच दिवशी महाराष्ट्र टाइम्स मध्ये पुण्यातील मुजोर रिक्षावाल्यांवर लेख आला होता… त्यातील माहिती तुम्हाला पण उपयोगी पडेल http://goo.gl/HMajY

My Memorable 25th

Happy Birthday अमोल, असे रात्री १२ वाजता mobile वर सर्वात प्रथम ‘तीचे’ शब्द कानावर पडले आणि नकळत मनामध्ये आनंदाची एक लहर येऊन गेली. Birthday… नाही नाही Happy Birthday असतोच मुळी असा. नातलग, मित्रमंडळी  यांचे येणारे SMS, फोन यामुळे एक वेगळाच उत्साह संचारतो, मग हळुच नजर Facebook आणि Orkut वरच्या शुभेच्छा संदेशांवर जाते आणि उगाचच आपला भाव वाढल्यासारखा वाटतो.
आज काय विशेष? असा नातलगांचा तर पार्टी कुठे? असा मित्रांचा प्रश्न ठरलेलाच असतो. दिलदारी दाखवायला यापेक्षा योग्य दिवस तो कुठला?
तर यंदा घरच्यांसोबत वाढदिवस Enjoy करण्याचा plan आहे, @मित्र  Party for sure पण नंतर कुठल्यातरी दिवशी ठरवू…
अरे हो, एक गोष्ट सांगायची राहिली, आज नकळत आठवण झाली ती बरोबर एका वर्षापूर्वी याच दिवशी कंपनी च्या project  साठी  औरंगाबादला असताना वाढदिवसाचे मला एक Great surprise मिळाले होते… त्यावेळेला तो surprise प्रसंग मी  शब्दबद्ध केला होता… आज तोच इथे मांडत  आहे, नक्की वाचाल हि अपेक्षा
——–My Memorable 25th————————————————————————————-7/4/10
A Big THANK to all my Bros for making my 25th birthday such memorable DAY…!

Due to professional commitments for very first time I was away from my family on my Birthday.

I would take a chance to tell you that incident which was happened on 7 April 2010 in Aurangabad. The whole day I was busy in meetings, project work, Discussion so couldn’t even think how would be the celebration tonight. Around 12 noon I have received a call from UD (Uday dada). He was asking my company address as he want to send me gift through courier. Then Dad’s turn He asked me to stay back at guest house after company and wait for one call (I thought, dad might have told his friend to take me to any hotel)

I had left company around 8.30 pm and went to guest house. Waiting ceremony last till 9.30 pm. meanwhile few calls from Dad just to ensure that I am in guest house. Around 9.45 UD called me again. This time he told me that Courier boy couldn’t find my address so suggested me to come at nearby place. Near to my guest house there is one famous Ganapati temple. It took me 10 minutes to reach at temple.

Where is that Courier Boy?

Suddenly from my right one car came near to me. On closely observing……Voila!! These are my Bros!! Surprise!!                                                                                                                   “I can’t believe it” this was the reaction when I saw them

Finally got into the car and slowly slowly tried to explore the plan…                                Abhay dada: Original idea and also cancelled one meeting.                                                  Uday dada: Fully supported despite of one tragedy (later I came to know before leaving Pune he mate with an small accident).                                                                                    Sameer: All the way from company (and yes next day he has to attend meeting in the morning).                                                                                                                                     Harsh: Sacrificed study time (next day there was practical scheduled for him).               Dad: Actor in supporting role (Not to forgettable, on that day around 4 AM he had sent me one nice SMS).                                                                                                                               Aai: Told me that we will definately celebrate your Birthday but never disclosed the details (really missed the ‘Oaukshan’ from you and Ajji)                                                                         Rest all: Indirectly supported the plan. (Thanks…)

Afterwards we headed toward Beed bypass as we already got information regarding resort ‘Madhuban’ from Sameer’s grandfather (Bhalu kaka). Party last till 1 AM and then all started (except me) moving back to Pune.

——–My Memorable 25th————————————————————————————-7/4/10

नांदिवली एक गाव

कधी कधी धकाधकीच्या जिवनातून जरा उसंत घेऊन थोडासा वेळ दुसरयांसाठी काढला की मनाला एक वेगळाच आनंद मिळून जातो, होय ना…? कृत्रिम  हसणे  सभोवताली  नेहमीच  बघतो  पण निरागस, अल्लड हसणे काय असते याचा प्रत्यय मला नुकताच नांदिवली मध्ये आला. माझे गाव ‘नांदिवली’. पुण्यातून पौड रस्त्याने तसेच पिंपरी-चिंचवड  मधून  हिंजवडी  मार्गाने  माझ्या  गावाला  येता  येते. अंदाजे ६० km अंतर असावे. थोडक्यात  परिचय,  नंतर  कधीतरी  नांदिवली, मुळशी विषयी बोलूच.

नांदिवली गाव

मुळशी परिसराचे काही विहंगम दृश्ये

आत्ता मला गप्पा मारायच्या आहेत त्या ९ जानेवारी २०११ रोजी  पार पडलेल्या कार्यक्रमा विषयी:
हा दिवस म्हणजे आजोबांचा (अण्णा) जन्मदिवस तसेच ६ वर्षांपासून जयंती दिवस, याच  दिवसाचे  औचित्य साधून आणि गावाविषयी  असलेल्या  आजोबांच्या  आत्मीयतेचा  वसा  पुढे  चालवताना  आम्ही   देशपांडे कुटुंब शाळकरी मुलांना प्रोत्साहनपर साहित्य वाटपाचा कार्यक्रम दरवर्षी आखतो.

वर्ष ६ वे:
गावामधील शाळा हि इयत्ता पाचवी पर्यंत भरली जाते. शाळा तशी लहान, सगळे विद्यार्थी मिळून १४ आणि एक गुरुजी. रविवार च्या दिवशी गुरुजी आणि ग्रामस्थांच्या  मदतीने  कार्यक्रम  नियोजित  वेळी  सकाळी  १० वाजता सुरु झाला. गुरुजींना कार्यक्रम  मला कसा अपेक्षित आहे हे थोडक्यात सांगितले.

स्थळ- वर्गकक्षा, नांदिवली गाव
गुरुजींनी प्रास्ताविक दिल्यावर मुलांनी एका सुरात पद्याने कार्यक्रमाची सुरवात केली. गुरुजींनी पाहुणे  आणि वरिष्ठ गावकरी मंडळींची ओळख करून दिली आणि मला दोन  शब्द बोलण्याचा आग्रह केला. नवीन लोक समोर असल्याने मुले जरा बावरलेली दिसत होती. काय बरे बोलावे? नुसतेच मौलिक
सल्ले देण्यापेक्षा यांच्याशी जरा हलक्या फुलक्या गप्पा मारल्या तर नक्कीच मुले खुलतील.

मी: मुलांनो आता तुम्ही मला तुमचे नाव इयत्ता तसेच आवडीची एखादी गोष्ट सांगायची
मुले: (अजूनही बावरलेले)
मी: तू उभा रहा, नाव काय तुझं ? इयत्ता कुठली?
मुलगा: गणेश…अं… इयत्ता पहिली
मी: काय आवडते तुला?
मुलगा: (नुसताच हसून)
मी: एखादा पदार्थ, वस्तू, पक्षी, प्राणी काही पण जे आवडते ते सांग
तो: कावळा
इतर  मंडळी: (खो खो हसून)
मी: …!! (मनात…कावळा का बरे? विचार करता असा अनुमान काढला की एकतर  कावळ्यांची  सभोवतालची असलेली विपुल उपलब्धता आणि घरोघरी असलेला समज की कावळा ओरडला म्हणजे पाहुणे येणार आणि मुलांसाठी पाहुणे म्हणजे खाऊ पर्यायाने आनंद…वा वा स्वतःलाच शाबासकी  देत)
मी: तू सांग
ती: मला मेथी
तो: चिक्कू
तो: चिंच
मी: चिंच! चोरून  खायला आवडते का? (…रम्य ते बालपण, …रम्य त्या केलेल्या पेरू, कैरी, आवळा  आणि चिंचेच्या चोरया  😉 )
मी: मोठयाने बोल
तो: (दबक्या आवाजात) मला पण कावळा…
इतर  मंडळी: (परत खो खो हसून)
ती: पालक
माझे बाबा: पालक म्हणजे भाजी की आई बाबा?
ती: भाजी…
इतर  मंडळी: (फिदीफिदी  हसून)
(अश्या प्रकारे सगळ्या मुलांची ओळख परेड पार पडली आणि बर का मुले एव्हाना समरस झाली होती.)

माझे छोटेखानी भाषण:
(इशारा: छोटेखानी भाषणाचे शब्दांकन हे अतीव छोटेखानी आहे त्यामुळे चिंता नसावी)
मी: “मुलांनो आज आपण इथे जमलो आहे ते माझ्या आजोबांच्या ६ व्या जयंती निमित्त. तुम्हाला  प्रश्न पडला असेल की का बरे हे लोक दरवर्षी येतात आणि आपल्याला  काहीतरी भेट देऊन जातात? ते केवळ तुम्ही शिकत आहात याला प्रोत्साहन मिळावे यासाठी. मुलांनो तुम्हाला माहित असेलच आपल्या  गावाजवळ सहारा  (Amby valley, २०-२५ km अंतरावर) नावाची  मोठी  कंपनी आहे. दहावी बारावी  पास असाल तर तिथे तुम्हाला सहज नोकरी मिळते. या  गावातील  तुमच्या  आधीच्या लोकांनी शिक्षण मधेच सोडले आणि सुवर्ण संधी गमावली (सत्य परिस्थिती). तुम्ही अशीच  जर शिक्षणाची संगत ठेवली  तर नक्कीच लोक तुम्हाला प्रोत्साहन म्हणून  अधिक चांगल्या चांगल्या भेटवस्तू देतील (शिक्षणासाठी आमिष). तर मग, मुलांनो  शिक्षणाची संगत कायम  ठेवणार ना?”
मुले: होssss

साहित्य वाटप कार्यक्रम:
येथून पुढे मुख्य असा साहित्य वाटपाचा कार्यक्रम सुरु झाला. यंदा मुलांना स्वेटर, शालोपयोगी वस्तू आणि खाऊ म्हणून बिस्कीट अश्या जिनसा दिल्या.

इथे कार्यक्रमाची क्षणचित्रे पहा

गुरुजींनी मग माजी सरपंचांना बोलायची विनंती केली, त्यांचे  बोलणे संपते ना संपते तोच उत्साहाच्या भरात समारोपाचे दोन शब्द बोलताना अचानक  एक  बॉंब टाकला…!!                             गुरुजी: (माझ्या वडिलांना निर्देशून) “काकांनी त्यांच्या  वडिलांच्या स्मरणार्थ हा कार्यक्रम केला, मुलांनो उद्या तुमचेही  वडील जाणार तेव्हा असाच कार्यक्रम तुम्ही सुद्धा करावा”  (आम्ही सगळे अवाक आणि निरुत्तर #!@*^?)

|| इति श्री नांदिवली ग्रामे कथा समाप्त  ||

[ता. क.: स्वेटर, साहित्य, खाऊ  खरेदी  तसेच  आलेल्या  पाहुण्यांची  चहा  नाश्त्याची  सोय  अश्या  महत्वाच्या आघाडया आई बाबांनी सांभाळल्या. त्यांच्या खंबीर पाठिंब्यामुळे अश्या समाजोपयोगी  कृतींना अधिकाधिक बळ मिळते]

नवीन पाहुणा आलाय बरका आमच्या कडे!

आज चा दिवस एकदम झकास गेला…कालच एक नवीन कविता (कैफियत) post करताना थोडा उशीर झाला झोपायला, आणि आज उजाडला शनिवार म्हणजे पहाटे ५.३० ला उठून Cricket practice ला जाणे आले. कसाबसा उठलो आणि धावत पळत निगडी-स्वारगेट बस पकडली. पोहोचायला उशीर व्हायचा तो झालाच, मग काय coach ने मैदानाला ३ फेरया मारण्याचे फर्मान काढले. त्या नंतर कवायती चा थोडा अवघड प्रकार, त्याचे थोडक्यात वर्णन असे (10 ‘Push ups’ at one end – 20 meter Sprint – 10 squats at other end – 20 meter Sprint – 10 Crunches – 20 meter Sprint – 10 Lunges – 20 meter Sprint – 10 Lunges other leg – and finally Star Jump, this is a one set and one has to do 2 sets…Huuhhh). Ground वर नेहमीप्रमाणे दव साचले होते त्यामुळे Net Practice बंद 😦 नाही म्हणायला Catches आणि Fielding चा सराव झाला.

आता होता क्रमांक Batting practice चा आणि तेही Bowling machine समोर. तेवढयात आई चा फोन वाजला. आणि फोनवर मी ->  “काय सांगतेस?” “कधी?” “Great news!” “हो हो लगेच निघतोय” …एव्हाना तुम्हाला कळलेच असेल कि ती खबर होती माझ्या भावाला (उदय मोकाशी)आणि वहिनीला (कांचन मोकाशी) सकाळीच पुत्ररत्ना चा लाभ झाला होता 🙂

येताना Bus मध्ये शांत न बसणाऱ्या माझ्या डोक्यात उगीचच काहीतरी ओळी वळवळल्या, त्या खालील प्रमाणे:
खाईल तर तुपाशी
नाही तर उपाशी
या जगात आलोय मघाशी
सांगून ठेवतोय! मैत्री करा माझ्याशी
कारण मी आहे ‘छोटा मोकाशी’ …(Kinda Welcome message)

बाळाची छबी फारच सुंदर – नातेवाईकांची रेलचेल – “हा न अगदी त्याच्या सारखा दिसतोय” “नाही ग हा हिच्या वर गेलाय?” असे काहीसे खात्रीलायक ऐकू येणार संवाद – भाऊ आणि वहिनीचा गगनात न मावणार आनंद – अजुन एका पणतू ला मांडीवर घेण्याचे मिळालेले समाधान –  शुभेच्छा चे खणाणनारे फोन…

[A new baby is like the beginning of all things – wonder, hope, a dream of possibilities [