सहस्त्र चंद्र आहेत साक्षीला

आज्जीच्या सहस्त्रचंद्रदर्शन सोहळ्यासाठी रचलेल्या ओळी…

आभाळाएवढी उत्तुंग तुझी माया
परोपकाराचे दिलेस धडे आम्हाला
तुझ्या अगाध महिमेला…
सहस्त्र चंद्र आहेत साक्षीला

अल्लड मुलगी होतीस कधी, झालीस संसारदक्ष पत्नी तू
आईचे ममत्व अन् आज्जीचा बटवा लेवून शोभतेस बरी पणजी तू
तुझ्या यशस्वी वाटचालीला…
सहस्त्र चंद्र आहेत साक्षीला

परस्थिती होती बिकट जेव्हा आव्हानांचा डोंगर उभा
धीराने रचलास कुटुंबाचा एकसंध पाया तेव्हा
तुझ्या विलक्षण त्यागाला…
सहस्त्र चंद्र आहेत साक्षीला

चिडलो रागावलो तुझ्यावर आम्ही जरी
दुरावले कधीच नाहीस तू अंतरी
तुझ्यातील ममतेच्या झऱ्याला…
सहस्त्र चंद्र आहेत साक्षीला

प्रत्येक गोष्टीवर तुझी चोख देखरेख असायची
हरवायची काही सोय त्यामुळे आम्हा नसायची
तुझ्या आज्जीदक्ष स्वभावाला…
सहस्त्र चंद्र आहेत साक्षीला

तुझ्याबद्दल सांगताना मज शब्द अपुरे पडले
चांदण्या रात्रीत माझे मलाच गहिवरून आले
मग हळूच मान वर करून चंद्राकडे पहिले
खर सांगतो आज्जी…
सहस्त्र दर्शनाने तुझ्या, त्याचे भारावलेले रूप मला दिसले!

आणि मग पोस्टरची कल्पना सुचली… फोटोचे डिझाईन माझेच फक्त Coral draw साठी एकाची मदत घेऊन प्रत्यक्षात उतरवले…

माझी छकुली

आई बाबाची सुंदर परी
नाजूक हसरी गोड गोजिरी

केसांची बट जेव्हा हळूच डोळ्यांसमोर येते
टपोरे डोळ्यांची जोडी आतून छान लुकलुकते

तिचे घरभर दुडू दुडू रांगणे, चुटू चुटू बोलणे
हरखून टाकणारे खट्याळ वागणे आणि नटखट हसणे

किती ग गोंडस तुझ्या गालावरची खळी दिसते
रागावली कि मात्र चिमुकल्या ओठांचा चंबू करून बसते

भरवताना मऊ-मऊ दुधभाताचा घास
चिऊ काऊशी तिची जमली गट्टी खास

दिवसामागून दिवस कसे भुर्रकन उडाले
तिच्या भोवतालच्या जादुई दुनियेत मीच हरवून गेले

तिच्या संगतीतला प्रत्येक क्षण म्हणजे मेजवानी
त्यातच मिळते तिच्या गोड गोड पप्पीची मिठाई

छकुलीसाठी माझ्या, देवी माते एक वर दे,
तिचे खूप मोठे नाव होऊ दे,
यश, कीर्ती आणि चांगले आरोग्य तिला मिळू दे…

– अनमोल

[एक छोटीशी सूचना… आई बाबा आणि छकुली या शब्दांच्या जागी तुम्ही तुमची खरी नावे वापरून हा शुभेच्छा संदेश शुभेच्छा पत्रावर, फोटोमध्ये, फेसबुकवर पाठवू शकता 🙂 …तुम्हाला वरील ओळी कश्या वाटल्या नक्की कळवा…]

मैं परेशान

नुकताच दहावीचा निकाला लागला, हुश्शsss सुटलो बुवा… काहिशी अशीच प्रतिक्रिया अनेकांची असणार (माहितेय, पुढच्या बेंच वरचे सो कॉल्ड टॉपर लोक वगैरे सोडून) …निकालानंतर सगळीकडे आनंदीआनंद असतो पण परीक्षेच्या आधी वर्षभर वातावरण वेगळेच दिसून येते. दहावीच्या परीक्षेला घरच्यांनी जणूकाही लढाईचे स्वरूप आणलेले असते, अश्या या लढाईत पालकसेनेकडून उतरलेल्या या बाल सेनापतीवर सर्व दिशेने प्रश्नांचा भडीमार होऊन लढाई सुरु होण्याआधीच त्याला नामोहरम केले जाते… यामुळेच कि काय कधी कधी गणित, विज्ञान, इतिहास, भूगोल हे विषय त्याला शत्रू वाटू लागतात, स्पर्धेच्या या जगात  सदैव पुढे राहण्याचा पालकांचा आग्रह मान्य, पण टोकाच्या अपेक्षांचे ओझे आपल्या पाल्यावर लादणे बरोबर नाही, पालकांच्या आणि समस्त नातेवाईकांच्या दहावी, बारावीबाबतच्या आतताईपणामुळे हाच बाल सेनापती आपली सर्व अस्त्रे गाळून पुढच्या आयुष्यातील खरी लढाई जिंकण्यासाठी मनातून पार ढासळून जातो…

मैं परेशान, एका हिंदी गाजलेल्या गाण्यातील शब्द थोडेसे ट्विस्ट करून, मनात कधी ना कधी अभ्यासाविषयी निर्माण झालेल्या वैतागाविषयी खरडण्याचा प्रयत्न

नए नए पन्ने किताबोंके क्यूँ सताते मुझे 
नए नए  सब्जेक्ट्स क्यूँ करने लगे इस कदर तंग मुझे

जरा जरा पढ़नेसे सोने लगा दिल मेरा 
जरा जरा टेन्शनसे दुखने लगा सिर मेरा  

मैं परेशान परेशान परेशान परेशान

मँथ्सका नाम न लेना…
सायन्ससे मैं हूँ खफा…
हिस्टरी एक बुरा सपना…  
जिओग्राफीका कुछ नहीं पता…

मैं परेशान परेशान परेशान परेशान
एक्जाम है सजा…!

सुंदर आहे मी

जसे वर्तुळावर कोनाचे असणे असंभव
जसे समांतर रेषांचा मिलाप अशक्य
तसे माझ्यातील विरोधाभासाचे संपणे अशक्य

रंग हिरवा नसेल तर झाडही नसावे झाड
उन्हात पडणाऱ्या पावसाला म्हणेल का कोणी आल्हाद
माझ्यात लपलेल्या मला घालेल का कोणी साद?

दिसत नाही तरी देवाचे अस्तित्व आम्हास मान्य
पटत नसल्या तरी परंपरेच्या जोखडी आम्हास मान्य
तुमच्यातिलच माझे मात्र अस्तित्व शून्य

तरीही…
सुंदर आहे हे जग, सुंदर आहात तुम्ही,
आणि!!
माझ्याच आभासी दुनियेत… सुंदर आहे मी…

– अनमोल

मी फक्त ऐकत होतो…!

निवडणुकीची धामधूम संपली!! कार्यकर्त्यांचा जोश, उमेदवारांची दानशूरता, ५०% आरक्षणामुळे महिलांचा पहिल्याच वेळेस दिसलेला प्रचारातील सहभाग असेच काहीसे चित्र नुकत्याच झालेल्या महानगरपालिकेच्या
निवडणुकीत दिसून आले. एक मिनिट, निवडणुकीबद्दल तेच तेच ऐकून, वाचून बोर झाला असाल ना? घाबरू नका निवडणुकीचे विश्लेषण काही इथे मी लिहित नाहीये…

काही दिवसांपूर्वी मी एका नाटकासाठी राजकारणावर काही ओळी लिहिल्या होत्या… तुम्ही ‘झेंडा’ हा चित्रपट पहिला असेलच, यातील ‘विठ्ठला, कोणता झेंडा घेऊ हाती’ हे परिणामकारक गाणे तर अत्यंत चपखलपणे या चित्रपटात वापरले आहे. प्रत्येक कार्यकर्ता हा शेवटी दुर्लक्षितच राहतो, हाच निष्कर्ष अवधूतने या चित्रपटात मांडला आहे. ह्याच गाण्यातील मतीतार्थ घेऊन माझ्या ओळी सिद्धार्थ चांदेकर आणि संतोष जुवेकर या चित्रपटातील मध्यवर्ती भूमिकेत असणाऱ्या पात्रांच्या मनात सुरु असणाऱ्या घालमेलीला जोडता येतील… वाचून तर पहा…

——————————————————————————————-

ते सांगत होते, आणि मी ऐकत होतो
पैश्यापुढे निर्भिडतेने हार मानली होती
ज्यांना दैवत मानले त्यांनी आज पाठ फिरवली होती
माझी बाजू ऐकून घेण्यास कोणी तयार नाही, मी फक्त ऐकत होतो…!

ते सांगत होते, आणि मी ऐकत होतो
साहेबांच्या दारी लाचारीचे जगणे पत्करले होते
जणू स्वतःच्या तत्वांचा आणि विचारांचा गळा घोटला होता
वापरलो गेलो साधे हेही कळले नाही, मी फक्त ऐकत होतो…!

कधी वाटले होते भगत होऊन बेधडक घुसावे
तर कधी गांधी होऊन संयमी हत्यार उपसावे
करू काहीच शकलो नाही, मी फक्त ऐकत होतो…!

ते खेळाची मजा पाहत होते, आणि मी त्याच खेळातला प्यादा बनलो होतो
ते तरीही सांगत होते, आणि मी षंढ नुसताच ऐकत होतो…!

जब निकलता हू मैं अपने घरसे

जब निकलता हू मैं अपने घरसे
मेरी आहटें तब पूछती है मुझसे
ऐ दोस्त मेरे, क्या करने चला है आज तू?
बस वही रुक पड़ते है मेरे कदम एक सोचसे,
क्या करे इस तबाही का हम!
क्यों सह ले भ्रष्ट लोगोंको हम!
क्यों ढूँढते है लोगों मैं बुराइयां हरदम
क्या खुद के घिरेबान में झाका कभी
छिपा लेते है जब अपनी गलतियाँ सभी
ना असलियत से दूर है हम
बस कहते है ”किस्मत के हाथों मजबूर है हम”
क्या मजबूरी, कैसी कमजोरी
इसी सोचसे तब घुटने लगता है दम
तभी एक आवाज़ पुकारती है हमे
सही सोच और राह दिखाती है हमे
उस सोच को पकडके चल पड़ते है हम
कुछ तो बदलाव जरुर लायेंगे ये थान लेते है हम
और तब दरवाज़े से निकलते है मेरे कदम….

नववर्षाभिनंदन 2012

 

सलाम सरत्या वर्षाला… 2011
दिलेस तू सामर्थ्य आणि विश्वास, तेव्हा लढलो आम्ही भ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध
दिलीस विचारांची ताकद, तेव्हा ओळखू शकलो सरकारची अयोग्य नीती
दिलेस तू Social Network चे हत्यार, तेव्हा भाग पाडले आमची मते ऐकण्यास
दाखवलीस नवी दिशा, तेव्हा वाटले नक्कीच येणारे वर्ष घेऊन येईल उज्वल भवितव्य

 

स्वागत नव्या वर्षाचे… 2012
संघटीत होऊन समाजकार्यासाठी झोकून देण्यास युवाशक्ती आता सज्ज
भ्रष्टाचारमुक्त भारत आमच्यासाठी यापुढे स्वप्न नव्हे वास्तव
या लोकशाहीची जनता खरी मालक हि खुणगाठ बांधून पक्की
मतांचे मोल जाणून नव्या वर्षात खरया लोकनायकाची निवड आता नक्की

 

नवीन वर्ष तुम्हाला धमाल सुखाचे जावो… 🙂

स्पंदन… एक नवा ध्यास, नवे स्वप्न

हो स्पंदन चा पहिला ठोका पडला सुद्धा… तुम्ही ऐकला नाही का?
बरं…  थोडक्यात सांगतो… ‘स्पंदन‘ ह्या नावाखाली आम्हा मित्रांनी काही तरी विधायक कामे  करण्याचे ठरवले आहे. त्याचीच सुरवात म्हणून १७ जुलै २०११ रोजी आम्ही आमच्या शाळेत (ज्ञान प्रबोधिनी, निगडी) आमच्या निवृत्त शिक्षकांचा कृतज्ञता सत्कार आणि शाळेच्याच जैव-तंत्रज्ञान प्रकल्पाला छोटीशी भेट देऊ करण्याचा कार्यक्रम आयोजित केला. कार्यक्रम अतिशय सुंदररीत्या पार पडला त्याबद्दल सर्व मित्रांचे आभार, सर्वांच्या परिश्रमातून नियोजनातून सुरवात तर चांगली झाली आता पुढे…
स्पंदन म्हणजे काय? केलेला काव्यात्मक स्पष्टीकरणाचा प्रयत्न…
स्पंदन… एक नवा ध्यास … नवे स्वप्न 
स्पंदन म्हणजे मातीशी जोडणारी नाळ
स्पंदन म्हणजे विश्वास आणि मैत्रीतला दुवा
स्पंदन म्हणजे निसर्गाशी जोडलेले नाते
स्पंदन म्हणजे समाजसेवेची गवसलेली दिशा
स्पंदन…  एक यज्ञ … एक पर्व
१७ जुलै २०११ ला पार पडलेला कार्यक्रम हा गौरी पाठक (आमच्याच शाळेतली विद्यार्थिनी)  हिच्या त्रितीय पुण्यस्मरणानिमित्त आयोजित केला होता. तिच्यामुळेच खर तर आम्हाला अस काही करू शकू याची प्रेरणा मिळाली.  तिच्या विषयी काही तरी लिहायचे होते, ४-५ दिवस प्रयत्न करत होतो पण शब्दांची आणि आशयाची जुळवाजुळव काय होत नव्हती. अखेर ओळी सुचल्या त्या अश्या…
सांजवेळी मावळताना सूर्याने ठेविला अंधार मागे
बरसताना जलधारा उरे रिक्त आकाश मागे
अश्याच जाण्याने तुझ्या राहिल्या त्या आठवणी मागे
 
अंधारही सरेल आता नव्या दिवसाच्या स्वागतासाठी
रिक्त आकाशही भरेल उद्या पुनश्च बरसण्यासाठी
म्हणूनच आठवणी जागवूया,
आठवणीत राहील अश्या कामाला सुरवात करण्यासाठी   
स्पंदन विषयी सविस्तर माहितीसाठी इथे facebook.com/spandan.pratishthan टिचकी मारा.

एका निवांत क्षणी…

मावळतीचे रंग मनोहारी लेवून दिशांचा हा साज
तो पहा निघालाय रवी जणू दिवस बुडवायला आज
वाऱ्याबरोबर वाहत आहे गंधारलेली गंधता
कुठून बरे येई गुरांची किणकिणणारी नादमयता?
सभोवताल भासे जणू हिरव्या हिरव्या गालीचासम
आणिक डौलात झुलणारे रानफुले जणू माणिक मोत्यांसम  
 
ना तो गोंगाट  भोवती ना कोणाची घाईगर्दी
इथे खुद्द लोलकानेही विसरावी गती स्वतःची
तिथे भौतिक परिसिमेत बंदिस्त आहे वाऱ्याचे  अस्तित्व
इथे मात्र मुक्तपणे संचार हाच जणू याचा धर्म 
 
झरझर कापत रस्ता, त्या वळणावर गाडी अमुची सुसाट
झरझर कापत रस्ता, त्या वळणावर गाडी अमुची सुसाट
वेळ आहे आता अंधाराच्या कवेत शिरण्याची,
अन् निशब्द शांतता अनुभवण्याची……
 
एका निवांत क्षणी असच काहीसं सुचलेलं…
 
अनमोल…

प्रेम हे असे का असते…

Happy V'day

प्रेम हे असे का असते..
कि सारे उमजुनही न उमजण्यास भाग पाडते
प्रेम हे असे का असते..
ज्यात कोणाची वाट पाहणे अगदी हवे हवेसे वाटते
प्रेम हे असे का असते..
कधी आठवणीच्या गर्दीने पूर्ण रात्र व्यापून टाकते
प्रेम हे असे का असते..
जे अडचणींशी सामना करण्याची उर्मी देऊन जाते
प्रेम हे असे का असते..
जे भर उन्हात सुद्धा एक वेगळाच थंडावा देते
प्रेम हे असे का असते..
ज्यात निकाला पेक्षा परीक्षा देण्याचेच टेन्शन अधिक असते
प्रेम हे असे का असते..
जे गडबड गोंगाटातही मनात मधुर सूर आळवते

जाऊ द्या ना…
प्रेम हे असेच असते
ज्यात पडण्यात खरी मजा असते 🙂

अनमोल…