आई बाबाची सुंदर परी
नाजूक हसरी गोड गोजिरी
केसांची बट जेव्हा हळूच डोळ्यांसमोर येते
टपोरे डोळ्यांची जोडी आतून छान लुकलुकते
तिचे घरभर दुडू दुडू रांगणे, चुटू चुटू बोलणे
हरखून टाकणारे खट्याळ वागणे आणि नटखट हसणे
किती ग गोंडस तुझ्या गालावरची खळी दिसते
रागावली कि मात्र चिमुकल्या ओठांचा चंबू करून बसते
भरवताना मऊ-मऊ दुधभाताचा घास
चिऊ काऊशी तिची जमली गट्टी खास
दिवसामागून दिवस कसे भुर्रकन उडाले
तिच्या भोवतालच्या जादुई दुनियेत मीच हरवून गेले
तिच्या संगतीतला प्रत्येक क्षण म्हणजे मेजवानी
त्यातच मिळते तिच्या गोड गोड पप्पीची मिठाई
छकुलीसाठी माझ्या, देवी माते एक वर दे,
तिचे खूप मोठे नाव होऊ दे,
यश, कीर्ती आणि चांगले आरोग्य तिला मिळू दे…
– अनमोल
[एक छोटीशी सूचना… आई बाबा आणि छकुली या शब्दांच्या जागी तुम्ही तुमची खरी नावे वापरून हा शुभेच्छा संदेश शुभेच्छा पत्रावर, फोटोमध्ये, फेसबुकवर पाठवू शकता 🙂 …तुम्हाला वरील ओळी कश्या वाटल्या नक्की कळवा…]
mast ahet ekdam agadi sajeshya oli ahet