नुकताच दहावीचा निकाला लागला, हुश्शsss सुटलो बुवा… काहिशी अशीच प्रतिक्रिया अनेकांची असणार (माहितेय, पुढच्या बेंच वरचे सो कॉल्ड टॉपर लोक वगैरे सोडून) …निकालानंतर सगळीकडे आनंदीआनंद असतो पण परीक्षेच्या आधी वर्षभर वातावरण वेगळेच दिसून येते. दहावीच्या परीक्षेला घरच्यांनी जणूकाही लढाईचे स्वरूप आणलेले असते, अश्या या लढाईत पालकसेनेकडून उतरलेल्या या बाल सेनापतीवर सर्व दिशेने प्रश्नांचा भडीमार होऊन लढाई सुरु होण्याआधीच त्याला नामोहरम केले जाते… यामुळेच कि काय कधी कधी गणित, विज्ञान, इतिहास, भूगोल हे विषय त्याला शत्रू वाटू लागतात, स्पर्धेच्या या जगात सदैव पुढे राहण्याचा पालकांचा आग्रह मान्य, पण टोकाच्या अपेक्षांचे ओझे आपल्या पाल्यावर लादणे बरोबर नाही, पालकांच्या आणि समस्त नातेवाईकांच्या दहावी, बारावीबाबतच्या आतताईपणामुळे हाच बाल सेनापती आपली सर्व अस्त्रे गाळून पुढच्या आयुष्यातील खरी लढाई जिंकण्यासाठी मनातून पार ढासळून जातो…
मैं परेशान, एका हिंदी गाजलेल्या गाण्यातील शब्द थोडेसे ट्विस्ट करून, मनात कधी ना कधी अभ्यासाविषयी निर्माण झालेल्या वैतागाविषयी खरडण्याचा प्रयत्न
नए नए पन्ने किताबोंके क्यूँ सताते मुझे
नए नए सब्जेक्ट्स क्यूँ करने लगे इस कदर तंग मुझे
जरा जरा पढ़नेसे सोने लगा दिल मेरा
जरा जरा टेन्शनसे दुखने लगा सिर मेरा
मैं परेशान परेशान परेशान परेशान
मँथ्सका नाम न लेना…
सायन्ससे मैं हूँ खफा…
हिस्टरी एक बुरा सपना…
जिओग्राफीका कुछ नहीं पता…
मैं परेशान परेशान परेशान परेशान
एक्जाम है सजा…!
sahi……..mast