जसे वर्तुळावर कोनाचे असणे असंभव
जसे समांतर रेषांचा मिलाप अशक्य
तसे माझ्यातील विरोधाभासाचे संपणे अशक्य
रंग हिरवा नसेल तर झाडही नसावे झाड
उन्हात पडणाऱ्या पावसाला म्हणेल का कोणी आल्हाद
माझ्यात लपलेल्या मला घालेल का कोणी साद?
दिसत नाही तरी देवाचे अस्तित्व आम्हास मान्य
पटत नसल्या तरी परंपरेच्या जोखडी आम्हास मान्य
तुमच्यातिलच माझे मात्र अस्तित्व शून्य
तरीही…
सुंदर आहे हे जग, सुंदर आहात तुम्ही,
आणि!!
माझ्याच आभासी दुनियेत… सुंदर आहे मी…
– अनमोल
अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद आयोजित ‘कवी संमेलनात’ या कवितेची निवड झाली होती, ३१ मे रोजी पार पडलेल्या या कार्यक्रमात पहिल्यांदाच मला माझी कविता वाचण्याची संधी मिळाली 🙂 त्याबद्दल सकाळ मध्ये आलेली बातमी खालील दुव्यावर वाचा
http://goo.gl/N8fHI