17/1/2012, सकाळी 11.15 पुणे स्टेशनलगत असलेल्या ST Stand वरून वाकडेवाडी, शिवाजीनगर कडे येताना रिक्षावाल्यांचा आलेला अनुभव
जवळपास 5 ते 6 रिक्षावाले direct 90 रुपयाची मागणी करत असताना, मी मीटर प्रमाणे चला म्हणल्यावर त्यांनी स्पष्ट शब्दात नकार दिला… काहीजणांनी आम्ही वाकडेवाडीला जात नाही असेही सांगितले. वैतागून थोडे पुढे चालत आलो तर Traffic Police दिसला, त्यांना मी विचारले जर रिक्षावाले मीटर प्रमाणे येत नसतील तर तक्रार कोणाकडे करायची? यावर तो म्हणाला “आमच्याकडेच…कोण नाही म्हणतो मीटर प्रमाणे… तुम्ही बसा त्या रिक्षामध्ये आणि माझ्या इथे थांबवा मग आपण कारवाई करू” मी माघारी फिरलो आणि परत रिक्षात बसलो, तेवढयात माझ्या मागोमाग पोलीस पण रिक्षाजवळ आला, आता मात्र रिक्षावाल्याची पंचाईत झाली, पोलिसाने licence जप्त कारवाईचा इशारा देताच तो “साहेब मी कुठे नाही म्हणालो मीटरप्रमाणे सोडायला…”
चरफडत का होईना मला मीटर प्रमाणे सोडण्यास निघालेल्या रिक्षावाल्याची प्रवासात धुसफूस चालूच होती… मला म्हणाला “रोज किती लोक येतात इथे पण तुमच्या सारखं कोणी मीटर मीटर करत नाही, तुम्ही पुण्यातले नाही वाटत” मी मनात विचार केला …बहुदा ह्याला भेटलेले पुणेकर एक तर फार श्रीमंत असतील नाहीतर फार घाईवर आलेले असतील…असो… प्रश्न राहिला मी पुणेकर आहे का नाही? तर…आमचे पूर्वज थेट शिवाजी महाराजांच्या काळापासून पुणे परिसरात वास्तव्यास होते, ह्या इतक्या सबळ विधानावरून नक्कीच मी पुण्यातलाच असणार.. नाही का? पुणेकर होण्यासाठी बहुदा हा नवीन निकष असावा कि रिक्षावाल्याकडे मीटर प्रमाणे चल असे न म्हणणे 😉 … पु.ल. देशपांडे यांनी पुणेकर होण्यासाठी काय करावे लागेल यावर आधीच जगाला हसवलंय… पण पु.ल. असते तर नक्कीच तेही रिक्षावाल्याच्या या उक्तीवर हसले असते… 🙂
…ह्या महाभागाला हे सर्व कोण समजावत बसणार So जास्त वादात न पडता (पुणेरी बाणा न दाखवता)वाकडेवाडी आल्यावर मीटर प्रमाणे झालेले 39 रुपये त्याचा हातावर टेकवले आणि माझ्या कामासाठी मी पुढे चालता झालो. कुठे 90 आणि कुठे 39 !! मात्र…गडबडीत त्या Traffic पोलिसाचे नाव विचारायला विसरलो… Really impressed with his prompt responce!
त्याच दिवशी महाराष्ट्र टाइम्स मध्ये पुण्यातील मुजोर रिक्षावाल्यांवर लेख आला होता… त्यातील माहिती तुम्हाला पण उपयोगी पडेल http://goo.gl/HMajY
🙂 chhan… punekarancha hiska ch dakhavalas ki tya rickshvalya kakanna…!!!! 🙂