हो स्पंदन चा पहिला ठोका पडला सुद्धा… तुम्ही ऐकला नाही का?
बरं… थोडक्यात सांगतो… ‘स्पंदन‘ ह्या नावाखाली आम्हा मित्रांनी काही तरी विधायक कामे करण्याचे ठरवले आहे. त्याचीच सुरवात म्हणून १७ जुलै २०११ रोजी आम्ही आमच्या शाळेत (ज्ञान प्रबोधिनी, निगडी) आमच्या निवृत्त शिक्षकांचा कृतज्ञता सत्कार आणि शाळेच्याच जैव-तंत्रज्ञान प्रकल्पाला छोटीशी भेट देऊ करण्याचा कार्यक्रम आयोजित केला. कार्यक्रम अतिशय सुंदररीत्या पार पडला त्याबद्दल सर्व मित्रांचे आभार, सर्वांच्या परिश्रमातून नियोजनातून सुरवात तर चांगली झाली आता पुढे…
स्पंदन म्हणजे काय? केलेला काव्यात्मक स्पष्टीकरणाचा प्रयत्न…
स्पंदन… एक नवा ध्यास … नवे स्वप्न
स्पंदन म्हणजे मातीशी जोडणारी नाळ
स्पंदन म्हणजे विश्वास आणि मैत्रीतला दुवा
स्पंदन म्हणजे निसर्गाशी जोडलेले नाते
स्पंदन म्हणजे विश्वास आणि मैत्रीतला दुवा
स्पंदन म्हणजे निसर्गाशी जोडलेले नाते
स्पंदन म्हणजे समाजसेवेची गवसलेली दिशा
स्पंदन… एक यज्ञ … एक पर्व
स्पंदन… एक यज्ञ … एक पर्व
१७ जुलै २०११ ला पार पडलेला कार्यक्रम हा गौरी पाठक (आमच्याच शाळेतली विद्यार्थिनी) हिच्या त्रितीय पुण्यस्मरणानिमित्त आयोजित केला होता. तिच्यामुळेच खर तर आम्हाला अस काही करू शकू याची प्रेरणा मिळाली. तिच्या विषयी काही तरी लिहायचे होते, ४-५ दिवस प्रयत्न करत होतो पण शब्दांची आणि आशयाची जुळवाजुळव काय होत नव्हती. अखेर ओळी सुचल्या त्या अश्या…
सांजवेळी मावळताना सूर्याने ठेविला अंधार मागे
बरसताना जलधारा उरे रिक्त आकाश मागे
अश्याच जाण्याने तुझ्या राहिल्या त्या आठवणी मागे
अंधारही सरेल आता नव्या दिवसाच्या स्वागतासाठी
रिक्त आकाशही भरेल उद्या पुनश्च बरसण्यासाठी
म्हणूनच आठवणी जागवूया,
आठवणीत राहील अश्या कामाला सुरवात करण्यासाठी
बरसताना जलधारा उरे रिक्त आकाश मागे
अश्याच जाण्याने तुझ्या राहिल्या त्या आठवणी मागे
अंधारही सरेल आता नव्या दिवसाच्या स्वागतासाठी
रिक्त आकाशही भरेल उद्या पुनश्च बरसण्यासाठी
म्हणूनच आठवणी जागवूया,
आठवणीत राहील अश्या कामाला सुरवात करण्यासाठी
स्पंदन विषयी सविस्तर माहितीसाठी इथे facebook.com/spandan.pratishthan टिचकी मारा.