पुणे – औरंगाबाद | 10 मे 2010, सकाळी 7 वाजता
प्रोजेक्ट निमित्त क्लायन्ट साईट ला औरंगाबाद ला जाण्यासाठी शिवाजीनगर बस स्थानकात शिवनेरीत बसलो…आणि अहो आश्चर्यं 10 वाजून 45 मिनटाला बाबा पेट्रोल पंप, औरंगाबाद ला पोहोचलो सुद्धा आणि पुढच्या 15 मिनटात क्लायन्ट च्या ऑफिस मध्ये हजेरी
एक सुखद धक्का बसला होता…
सांगली – पुणे | 14 नोव्हेंबर 2010, संध्याकाळी 6 वाजता
सांगली वरून पुण्याकडे प्रयाण केले, अंतर तेवढेच अंदाजे 200 km तेही 4 तासात पार झाले
वा वा credit goes to महाराष्ट्र शासन…
असाच चांगला अनुभव पुणे – नाशिक प्रवासात पण आला होता… पुणे – मुंबई प्रवास तर अगदी पलक झपकतेही … दादर वरून निगडी ला केवळ 2 तास 20 मिनटात… Great!!
महाराष्ट्र सरकारचा विजय असो!!
————————————————————————————————-
असू देत असू देत… जास्त स्तुती सुमने आम्ही खपवून नाही घेणार समजलं… आम्हाला मुळी त्याची सवय नाही… झाली काही कामे (तुमच्या दृष्टीने चांगली) आमच्या हातातून चुकून म्हणजे आम्ही सतत तुमचेच ऐकावे का?
अहो पाश्चात्यांचे अंधानुकरण करण्याचे आजकाल फॅडच आले आहे. गुळगुळीत रस्ते, म्हणे पोटातले पाणी हलणार नाही छॅ… अहो थोडेफार खड्डे हे हवेच अंगाचा व्यायाम होत नाही का त्याने…. कशाला हवेत ते उड्डाणपूल आणि Service road, चौपदरी रस्ते … उगीच वायफळ खर्च … Traffic मुळे खोळंबा नाही हे योग्य आहे का?… लांबच लांब गाड्यांची लागणारी रांग काय तुम्हाला बघवत नाही?… किती मजा असते त्यात… याच खोळंब्यामुळे आमचे Truck वाले बंधू वैचारिक देवाण घेवाण करू शकतात…
आपली ही रोड संस्कृती’ जपण्याचा आणि संवर्धनाचा आमचा मनोनिग्रह आहे…इतर रस्ते तर आमच्या हातातून सुटले आहेत पण ‘पुणे – सोलापूर हायवे’ साठी आम्ही निकराचा लढा देऊ
तद बद्दल आमचे काही प्रामाणिक प्रयत्न :
1. ठिक ठिकाणी रस्ता रुंदीकरणाची कामे (आमच्या इच्छेविरुद्ध) अतिशय संथ गतीने सुरु ठेवून… आम्ही Driver चे कौशल्य वाढवण्यावर भर देत आहे.. जेणेकरून पुणे – सोलापूर हायवे वर चालवणारा माणूस जगात नाही तर विश्वाच्या पाठीवर कुठेही चालवू शकतो…आणि हे शक्य आहे यावर आमचा विश्वास आहे
आमच्या सूत्रांनी चंद्रावरील खडबडीत भागाचे फोटो पाहिलेले आहे त्यामुळे तसाच अनुभव येथे मिळण्यासाठी इंदापूर नजीकचा टप्पा आमच्या विचाराधीन आहे.
2. National Highway 9 असा मान आम्हाला आहे … म्हणून काय रेल्वेशी आम्ही वाकड्यात शिरू काय?… अहो रेल्वे ची एकच लाईन आहे त्या टेमभूर्णी जवळ .. उगीचच त्यावर उड्डाणपूल टाकून त्यांचा अपमान करण्यास आम्ही तयार नाही
3. “पुढे अपघाती वळण आहे वाहने सावकाश चालवा” अश्या आशयाची किमान 1000 फलक नुकतेच बनवायला टाकले आहेत पण आमची यावर एक नामी युक्ती आहे. 1000 फलका ऐवजी एकच मोठा फलक बनवून टाकू “पुणे-सोलापूर हायवे सरसकट अपघात प्रवण क्षेत्र आहे तरी वाहने सावकाश चालवा”… खर्चात पण बचत होईल त्याने आणि सारखा तोच तोच संदेश वाचून प्रवासी कंटाळणार नाही
पण काय करणार… काही नतद्रश्तानी बहुमताने पुणे-सोलापूर हायवे चौपदरी करण्याचा ठराव मंजूर करून घेतला आहे. हा हायवे सुद्धा आमच्या कडून सुटणार कि काय अशी भीती वाटते… तरी जितका उशीर करता येईल तितका करण्याचा आम्ही प्रयत्न करू बाकी परमेश्वर बघून घेईल.
————————————————————————————————-
पुणे-सोलापूर हायवे | 29 मे 2011 वेळ सकाळी 7 वाजता
सोलापूर च्या आधी 30 km वर असणाऱ्या मोहोळ ह्या गावी मित्राच्या साखरपुड्याला पोहोचायला चक्क 7.30 तास लागले अंतर तेवढेच 210 km
अरे बाप रे काय डेनजर प्रवास होता तो… का सरकार ह्याच हायवे बद्दल इतके उदासीन आहे ??
देवा, कुमार सुशीलांचे विमान पंक्चर होऊ देत आणि त्यांना सोलापूर हायवे चा दिव्य प्रवास घडू देत… नाहीतरी त्याच हायवे वर एक फलक दर्शवितो … ‘दिल्ली -> 1710 km‘
Mast re Mitra…….Me khupada anubhavaloy…Pune Soalpur Bus Pravas…..karan every weekend Pune solapur pravas asato maza…..kadhi Train kadhi Bus……Ek namud karav watat ki even Pu. La. Deshpande ni tyanchya “VangaChitre” hya pustakat…Pune Solapur highwaych warnan kelay.. Jar Ugada bodaka dongar, ani khaddyancha rasta pahaycha asel tar ha Highway Uttam ahe mhanun…..Hasanyawari sodun dyav lagate. Pan kadhi kadhi wait hi watat Solapurcha asalyamule. Aso….Mast Lekh
Thanks, मी पण जेव्हा प्रथम अनुभव घेतला तेव्हा अश्या दिव्या प्रवासाविषयी लिहावेसे वाटले…
Zakkas Re mitra….. lai bhari ….!!!
atishay sundar lekh aahe…..jaamnya ha lekh mala manapasun aawadala…..agdi god bhashet marlies salyanchi………saglya highways che comparison pan zakaaas ch kele aahes……asech lihit ja……..great work………
fakt ‘रेल्वे शी’ , ‘फॅड च’ ase shabd pudhchya weles neet jodun lihi 🙂
ok शब्द जोडले…
Bravo!!!!! One strong slap to Govt. of Maharashtra.