नवीन पाहुणा आलाय बरका आमच्या कडे!

आज चा दिवस एकदम झकास गेला…कालच एक नवीन कविता (कैफियत) post करताना थोडा उशीर झाला झोपायला, आणि आज उजाडला शनिवार म्हणजे पहाटे ५.३० ला उठून Cricket practice ला जाणे आले. कसाबसा उठलो आणि धावत पळत निगडी-स्वारगेट बस पकडली. पोहोचायला उशीर व्हायचा तो झालाच, मग काय coach ने मैदानाला ३ फेरया मारण्याचे फर्मान काढले. त्या नंतर कवायती चा थोडा अवघड प्रकार, त्याचे थोडक्यात वर्णन असे (10 ‘Push ups’ at one end – 20 meter Sprint – 10 squats at other end – 20 meter Sprint – 10 Crunches – 20 meter Sprint – 10 Lunges – 20 meter Sprint – 10 Lunges other leg – and finally Star Jump, this is a one set and one has to do 2 sets…Huuhhh). Ground वर नेहमीप्रमाणे दव साचले होते त्यामुळे Net Practice बंद 😦 नाही म्हणायला Catches आणि Fielding चा सराव झाला.

आता होता क्रमांक Batting practice चा आणि तेही Bowling machine समोर. तेवढयात आई चा फोन वाजला. आणि फोनवर मी ->  “काय सांगतेस?” “कधी?” “Great news!” “हो हो लगेच निघतोय” …एव्हाना तुम्हाला कळलेच असेल कि ती खबर होती माझ्या भावाला (उदय मोकाशी)आणि वहिनीला (कांचन मोकाशी) सकाळीच पुत्ररत्ना चा लाभ झाला होता 🙂

येताना Bus मध्ये शांत न बसणाऱ्या माझ्या डोक्यात उगीचच काहीतरी ओळी वळवळल्या, त्या खालील प्रमाणे:
खाईल तर तुपाशी
नाही तर उपाशी
या जगात आलोय मघाशी
सांगून ठेवतोय! मैत्री करा माझ्याशी
कारण मी आहे ‘छोटा मोकाशी’ …(Kinda Welcome message)

बाळाची छबी फारच सुंदर – नातेवाईकांची रेलचेल – “हा न अगदी त्याच्या सारखा दिसतोय” “नाही ग हा हिच्या वर गेलाय?” असे काहीसे खात्रीलायक ऐकू येणार संवाद – भाऊ आणि वहिनीचा गगनात न मावणार आनंद – अजुन एका पणतू ला मांडीवर घेण्याचे मिळालेले समाधान –  शुभेच्छा चे खणाणनारे फोन…

[A new baby is like the beginning of all things – wonder, hope, a dream of possibilities [

8 thoughts on “नवीन पाहुणा आलाय बरका आमच्या कडे!

    1. धन्यवाद! खरच माझे भाग्य जे तुमच्या सारख्या व्यक्तीने माझ्या blog वर उपस्थिती लावावी. तुमच्या blog चा मी चाहता आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s