कैफियत

पुन्हा मन विचारांच्या गर्द डोहात झेपावले…
अन् नात्यांचे न सुटणारे कोडे उलगडू लागले…

हळू हळू शिरकाऊ पाहत आहे इथे राजकारण
का असत्यालाच दिले जात आहे महत्व अकारण?

चाली वर चाली, अहो आहे का हो हि राजनीती
चोराला सोडून संन्याशाला फाशी हि कैसी नीती?

शून्य आहे यांच्याकडे विचारांची परिपक्वता
मग उगीचच मोठे असल्याचे बिरूद कशाला मिरवता?

वंदितो अवघा समाज, कारण तयाचे परोपकार
त्यांनाच यावी उपेक्षा वाटयाला, हेच मुळी कसे पटणार?

वाटले होते आत्ताच कुठे सुरु झाले आनंदपर्व
पण का बरे खो घालण्यास तयार आहेत हे सर्व?

काही नाती असतात रक्ताची, तर काही हृदयाची
काही जन्मो जन्मीची, तर काही सुख-दुखाची
हे सारं अगदी खरय ना?
मग देवा कोडे न सुटण्याचे एक तरी कारण दे ना…                                                                              

अनमोल…

7 thoughts on “कैफियत

    1. हो बरोबर… देवाने कारण देणे हे अपेक्षित नाहीये मुळी पण Asking god for reason only shows that he (a young boy) felt whatever happening around is illogical. A boy is optimistic and wants everyone together but little helpless coz of his age. थोडक्यात काय तर मला इथे नात्यांमधील गुंतागुंत मांडायची आहे आणि केवळ काही narrow minded लोकांमुळे नात्यांची कशी समीकरणे बिघडतात हे दर्शवायचे आहे.

    1. मी तर फक्त छायाचित्रांची मांडणी केली, पण माझ्या कवितेत मला अभिप्रेत अर्थ बरोबर उमजून समर्पक अशी छायाचित्र पाठवण्यासाठी खरच आभार. मेल मध्ये तुझ्या सूचनांना केलेला reply इथे उधृत करू इच्छितो -> “Finally one thing amazed me, the the way you replied to my mail (simply fantabulous!) thanks for making me think from different angle :)”

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s